Headlines

Video | प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले…

Video | प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले…
Video | प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले…


सध्या महाराष्ट्रातील राजकारणात एक नाव केंद्रस्थानी आहे ते म्हणजे प्राजक्त तनपूरे. राज्यात एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीची धूम चालू आहे. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आपापल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. काही नेत्यांनी आपली भविष्यातील राजकीय सोय लक्षात घेऊन पक्षातर करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमध्ये सध्या जागावाटपावर खल चालू आहे. दुसरीकडे अहिल्यानगरातील नेते प्राजक्त तनपुरे यांनी शरद पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकून भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी प्राजक्त तनपूरे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशावेळी तनपूरे म्हणाले, मला भाजपाने संधी दिली यासाठी मी आभारी आहे. यापुढे पक्ष मला जी काही जबाबदारी देईल, ती जबादारी पार पाडण्याचे काम मी करतो, असे प्राजक्त तनपुरे म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *