
आज सकाळी आळंदीत विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. हभप संग्राम भंडारे यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. संग्राम महाराज भंडारे यांनी कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना काळ फासलं. लवांडे यांनी गुरुवर्य साधुसंत हे घुसघोर असल्याचं वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर काँग्रेसने खोचक प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांच्याकडून संग्राम भंडारी हा गुन्हेगार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “भगव्या कपड्या आड ज्या पद्धतीने घुसखोर घुसल्याचे विकास लवांडे यांनी अतिशय पुराव्यासहित सिद्ध केले आहे. त्याचा प्रत्यय आज खऱ्या अर्थाने आला आहे. वारकऱ्यांच्या वेशामध्ये यांनी घुसखोरी केली आहे” असं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.
“संग्राम बापू भंडारे नावाचा गुन्हेगार आहे. त्याने अहिल्यानगर मध्ये अशाच प्रकारचे एक स्टेटमेंट केलं होतं. त्यामुळे वाद देखील झाला होता. हा स्वतःला ह.भ.प. म्हणून घेणार असेल किंवा वारकरी संप्रदायातील म्हणून घेणारा आहे. मात्र त्याचे समर्थक काळी शाई टाकून एखाद्याला इजा करणार असतील, तर तुम्हाला कोणत्या उद्देशाने ह.भ.प.म्हणावं. वारकरी संप्रदायातील ही परंपरा आहे का? शब्दांचा विरोधात शब्दानेच केला पाहिजे” असं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.
त्याच्या समर्थकांचा आम्ही निषेध व्यक्त करतो
“संग्राम बापू भंडारे नामक एक मोठा गुन्हेगार वारकऱ्यांच्या आडून हा भाजप प्रणित गुन्हेगार आहे. भंडारे याला भाजपकडून फंडिंग होतं. भाजपच्या तथाकथित गुंडाने पुरोगामी विचाराची लढाई लढणाऱ्या विलास लवांडे यांच्यावरती शाईफेक करून इजा करतो. अशा संग्राम भंडारे आणि त्याच्या समर्थकांचा आम्ही निषेध व्यक्त करतो” असं काँग्रेसने म्हटलं आहे.
त्याला आत मध्ये टाकला पाहिजे
“सत्याची बाजू घेऊन बोलल्यावर तुम्ही आमचा पानसरे आणि दाभोळकर करणार असाल तर यापुढे आम्ही जीवाला मुकायला तयार आहोत. पण आम्ही खऱ्याची बाजू सोडणार नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, संग्राम भंडारे नावाच्या गुन्हेगाराला तात्काळ अटक करा. त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल करून त्याला आत मध्ये टाकला पाहिजे” असं काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.
मी खरं बोलावं की नाही
“माझ्या मनात सुद्धा भीती बसली आहे. मी खरं बोलावं की नाही. एखाद्याचा जीव जाणार असेल तर निश्चितपणे आयुष्याच्या शेवटपर्यंत आमचा जीव गेला तरी आम्ही खरं बोलणार. असे संग्राम बापू भंडारे किती जरी आले, तरी आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करू. विचारांचा विरोध हा विचारांनी झाला पाहिजे” असं काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.