
इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या 3 महिन्यापेक्षा अधिक काळापासून युद्ध सुरू आहे. होर्मुज खाडी इराणकडून बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाचे संकट आहे. या युद्धामुळे जग जैरीस आले. त्यामध्येच आता जगाची झोप उडवणारी बातमी पुढे येत आहे. आता इराणकडून अत्यंत मोठी धमकी देण्यात आली. थेट बाब अल मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याची मोठी धमकी देण्यात आली. होर्मुज खाडीनंतर जर ही खाडी बंद झाली तर जग अधिक संकटात येऊ शकते. जगातील अनेक देशांना गंभीर तेल आणि वायू संकटाचा सामना करावा लागत आहे. जर बाब अल-मंदेब खरोखरच बंद झाली तर हा विनाशकारी परिणाम जगाला भोगावे लागू शकतात. होर्मुज खाडी बंद असल्याने अगोदरच तीन तेरा वाजले. त्यातच आता ही खाडी बंद करण्याचा इशारा देण्यात आला.
बाब अल-मंदेब सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा इराणने दिला. तेहरान अधिक आक्रमक होताना दिसतोय. होर्मुजनंतर थेट बाब अल-मंदेब खाडी बंद करण्याकरिता पाऊले उचलली जात आहेत. यासोबतच अमेरिकेची दुखती नस दाबण्याचा प्रयत्न केला. बाब अल-मंदेब खाडीत अमेरिकेला कोणतीही सवलत देण्यास इराणने नकार दिला.
बाब अल-मंदेब बंद झाला तर त्याचा परिणाम कोणत्या एका देशावर नाही तर संपूर्ण जगावर होईल. फोर्ब्सच्या मते, जगातील सुमारे 14 टक्के सागरी व्यापार या खाडीतून होतो. आशियातून युरोपला जाणारी जवळपास सर्व व्यावसायिक कंटेनर जहाजे येथूनच निघतात. जर ही खाडी बंद झाली तर याचा थेट परिणाम जगावर होऊ शकतो. त्यामुळे हा मोठा धोका आहे.
पूर्ण वाहतूकच बंद होईल. आशिया आणि युरोपला जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. पूर्ण व्यापार ठप्प होईल. इराण अमेरिकेसोबतच्या युद्धात अधिक आ्क्रमक भूमिका घेत आहे. जर हे युद्ध अजून काही दिवस चालले तर जगाला याचे घातक परिणाम भोगावे लागू शकतात. स्थिती अधिक गंभीर होईल. सध्याच अनेक अनेक देशात लॉकडाऊनची स्थिती आहे.