Headlines

ऐ यांची नावे लिहून घे, तुम्हाला काय….सुनेत्रा पवार प्रचंड संतापल्या; बारामतीत कर्मचाऱ्यांना झापलं!

ऐ यांची नावे लिहून घे, तुम्हाला काय….सुनेत्रा पवार प्रचंड संतापल्या; बारामतीत कर्मचाऱ्यांना झापलं!
ऐ यांची नावे लिहून घे, तुम्हाला काय….सुनेत्रा पवार प्रचंड संतापल्या; बारामतीत कर्मचाऱ्यांना झापलं!


Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आता राज्याच्या राजकारणात चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. राज्यकारा हाकत असताना निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग पाहायला मिळत आहे. तसेच आता त्या त्यांच्या बारामती या मतदारसंघाकडेही विशेष लक्ष देत आहेत. नुकतेच सुनेत्रा पवार यांची प्रशासनावर असलेली पकड आणि स्वच्छतेप्रती असलेली तळमळ याची प्रचिती पाहायला मिळाली. सुनेत्रा पवार यांनी रविवारी म्हणजेच 7 जून रोजी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी रुग्णालयाचे काम, स्वच्छता तसेच इतर बाबींची पाहणी केली. रुग्णालयातील काही गोष्टींवर बेट ठेवत त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांनाही चांगलंच झापलं आहे.

हलगर्जीपणा कराल तर…

रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छतेची स्थिती, औषधांचा पुरवठा तसेच एकूण व्यवस्थापनाची सखोल माहिती जाणून घेतली. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशीही त्यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देत जबाबदारीने व तत्परतेने काम करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या.

आवश्यक त्या उपायोजना तातडीने करा

रुग्णालय परिसरात स्वच्छता राखण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत. आरोग्य सेवांमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले. गेल्या काही दिवसांपासून बारामती वैद्यकीय महाविद्यालयाबाबत अनेक तक्रारी होत्या. म्हणूनच सुनेत्रा पवार यांनी या महाविद्यालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली.

तुम्हाला खूप जास्त काम झालं का?

या पाहणीत त्यांनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावल्याचेही दिसून आले. रुग्णांसाठीच्या उशा कशा ठेवल्या आहेत. तुम्ही फक्त मोबाईलमध्येच दिवसभर असता का? स्वच्छता कशाला म्हणतात? तुम्हाला खूप जास्त काम आहे का? असा सवालही सुनेत्रा पवार विचारताना दिसत आहेत. जे कोणी कामात हलगर्जीपणा करतील त्यांची नावे लिहू घ्या, असा आदेशही त्यांनी दिल्याचे पाहायला मिळाले.

पाहा व्हिडीओ :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *