Headlines

कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण

कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण
कैगा अणुऊर्जा प्रकल्पात सर्वात मोठी अखंड काँक्रीट ओतणी पूर्ण


मुंबई 6 जुलै 2026: मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ने कर्नाटकातील कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट्स ५ आणि ६ साठी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर (PHWR) निर्मीतीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने NPCIL च्या इतिहासातील सर्वात मोठे विनाखंड काँक्रीट ओतण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले.

या कामात तब्बल ७,२५० घनमीटर काँक्रीट वापरण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर विनाखंड काँक्रीट ओतणे हे MEIL उभारत असलेल्या खाजगी सहभागातील भारताच्या पहिल्याच अणुऊर्जा प्रकल्पासाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. यामुळे कंपनीची अभियांत्रिकी क्षमता, नियोजन आणि अंमलबजावणीतील कौशल्य अधोरेखित झाले आहे.

प्रतिकूल हवामान, मुसळधार पाऊस आणि दुर्गम ठिकाण असूनही MEIL ने अत्याधुनिक तंत्रज्ञान, तापमान-नियंत्रित काँक्रीट उत्पादन, बर्फ निर्मिती व साठवण क्षमता, तसेच मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची उपलब्धता ठेउन हे काम कोणताही खंड न पाडता पूर्ण केले.
या कामासाठी शेकडो अभियंते, तंत्रज्ञ, सुरक्षा कर्मचारी आणि कामगारांनी अहोरात्र मेहनत घेतली. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आणि गुणवत्ता तपासण्या पूर्ण करून हे काम यशस्वी करण्यात आले.

भारताच्या स्वदेशी अणुऊर्जा कार्यक्रमाला गती देतानाच ‘स्वच्छ ऊर्जा मोहिमे’त हे महत्त्वाचे योगदान मानता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *