Headlines

कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन, दिल्लीत थेट…नेमकं काय घडणार?

कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ,  आता सर्वात मोठं आंदोलन, दिल्लीत थेट…नेमकं काय घडणार?
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ,  आता सर्वात मोठं आंदोलन, दिल्लीत थेट…नेमकं काय घडणार?

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली असताना अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीने आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

अभिजीत दीपके याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत विद्यार्थ्यांना, पालकांना आणि या प्रकरणामुळे नाराज असलेल्या नागरिकांना दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ‘मला एअरपोर्टवर भेटा, आपण सर्व मिळून आवाज उठवू,’ असं तो व्हिडीओमध्ये म्हणाला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत असून अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. अभिजीत दीपके हा विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी दिल्लीला येणार असून देशासाठी काहीतरी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्याने म्हटलं आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *