Headlines

खरात प्रकरणात मोठी खळबळ! मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांचा समावेश; बड्या नेत्याचा मोठा खुलासा

खरात प्रकरणात मोठी खळबळ! मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांचा समावेश; बड्या नेत्याचा मोठा खुलासा
खरात प्रकरणात मोठी खळबळ! मंत्रिमंडळातील 4 मंत्र्यांचा समावेश; बड्या नेत्याचा मोठा खुलासा


महाराष्ट्राच्या राजकारणात ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामध्ये राज्य मंत्रिमंडळातील तब्बल चार मंत्र्यांचा थेट समावेश असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या मंत्र्यांची नावे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळवणार असून, त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याचेही पटोले यांनी स्पष्ट केले.

“मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा”

नाना पटोले यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करताना सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. “आम्ही यापूर्वीही विधानसभेत या विषयावर आवाज उठवला होता. खरातकडून सर्व माहिती काढून घेतली जात आहे, पण भीती अशी आहे की, ज्याप्रमाणे अक्षय शिंदेला मारले गेले, तसेच याचेही केले जाईल. या संपूर्ण प्रकरणात चार मंत्र्यांचे हात गुंतलेले आहेत आणि त्याची वस्तुस्थिती लवकरच समोर येईल,” असे पटोले म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना देणार पत्र

या प्रकरणातील पुराव्यांबाबत बोलताना पटोले यांनी सांगितले की, “या चारही मंत्र्यांच्या सहभागाबाबतची सविस्तर पत्रे आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत. ज्या मंत्र्यांची नावे या प्रकरणात येत आहेत. त्यामुळे या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, ही आमची प्रमुख मागणी आहे.”

खरात प्रकरणात कोणत्या बड्या नेत्यांची नावे आहेत, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नसला तरी, नाना पटोले यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

खरात प्रकरण नेमंक काय आहे?

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात दिवसेंदिवस चांगलाच अडकत चालला आहे. खरातवर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. खरातने स्वत:कडे दैवी शक्त असल्याचे सांगत अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. खरातचे अत्याचार करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर खरातने अनेक व्यावसायिकांची देखील फसवणूक केल्याचे उघड झाले. दरम्यान, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या बहिणीचे आणि खरातचे जवळचे संबंध असल्याचे देखली उघड झाले. आता खरात प्रकरणात आणखी चार मंत्र्यांची नावे समोर आली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *