Headlines

गरजेच्या वेळी त्यांनी पाठ फिरवली, मी थेट नातंच..; अभिनेत्रीने सांगितला गरोदरपणातील कटू अनुभव

गरजेच्या वेळी त्यांनी पाठ फिरवली, मी थेट नातंच..; अभिनेत्रीने सांगितला गरोदरपणातील कटू अनुभव
गरजेच्या वेळी त्यांनी पाठ फिरवली, मी थेट नातंच..; अभिनेत्रीने सांगितला गरोदरपणातील कटू अनुभव


टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिच्या या बेधडक स्वभावानेच तिला ‘बिग बॉस 14’ची विजेती बनवलं होतं. त्यानंतर 2023 मध्ये रुबिना जुळ्या मुलांची आई बनली. आता अभिनेत्री जन्नत जुबैरच्या पॉडकास्ट मुलाखतीत रुबिना तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. वेळेनुसार आयुष्यात आणि नातेसंबंधात काय बदल होतात, याविषयी सांगताना तिने अनेक मित्रमैत्रिणींशी फारकत घेतल्याचा खुलासा केला. यावेळी तिने गरोदरपणातील सर्वांत कटु अनुभव सांगितला. जेव्हा रुबिनाला सर्वांत जास्त गरज होती, त्याच काळात तिच्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींनीच साथ दिली नव्हती. त्यामुळे तिने त्या सर्वांसोबतचं नातं संपवलं होतं.

रुबिना म्हणाली, “खरं सांगायचं तर प्रेग्नंसी हा माझं आयुष्य बदलणारा अनुभव होता. मी त्या सर्व लोकांपासून दूर गेली, जे स्वत:ला माझे मित्र म्हणायचे. पार्ट्यांमध्ये, आनंदाच्या दिवसांत आणि कदाचित दु:खातही ते माझ्यासोबत होते, परंतु वाईट दिवसांमध्ये कोणीच आलं नव्हतं. मी गरोदर असताना ते माझ्यासोबत नव्हते. मी कोणतंच स्पष्टीकरण न देता त्यांना माझ्या आयुष्यातून काढून टाकलं होतं. माझ्यासमोर तू मैत्रीची एक नवी परिभाषा मांडलीस आणि माझ्यासाठी ती सर्वांत मोठी शिकवण आहे.”

रुबिना दिलैक अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली. बिग बॉस या शोमध्ये सलमान खाननेही तिचं कौतुक केलं होतं. रुबिना आणि तिचा पती अभिनव शुक्ला हे ‘बिग बॉस 14’मध्ये अशा वेळी सहभागी झाले होते, जेव्हा त्यांचं नातेसंबंध खूपच तणावाखाली होतं. त्यांनी जवळपास विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. परंतु बिग बॉसच्या घरात एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यातील कटुता कमी झाली.

रुबिनाने ‘छोटी बहू’, ‘शक्ती’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. परंतु बिग बॉसच्या चौदाव्या सिझनचं विजेतेपद पटकावल्यानंतर ती कोणत्याही मालिकेत झळकली नाही. तिने ‘खतरों के खिलाडी’, ‘झलक दिखला जा 10’, ‘लाफ्टर शेफ्स’, ‘पती पत्नी और पंगा’ यांसारख्या रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला होता.

रुबिनाच्या जुळ्या मुलींची नावं जीवा आणि इधा अशी आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहणाऱ्या रुबिनाने तिच्या जुळ्या मुलींसाठी चक्क हे शहर सोडलंय. यात पती अभिनव शुक्लानेही तिची पूर्ण साथ दिली आहे. पारस छाब्राच्या या पॉडकास्टमध्ये रुबिनाने सांगितलं होतं की, गेल्या काही महिन्यांपासून ती हिमाचल प्रदेश याठिकाणी राहत आहे. रुबिना मूळची तिथलीच असल्याने गावातल्या स्वच्छ आणि सुंदर वातावरणात मुलींचं संगोपन करण्यासाठी तिने हा मोठा निर्णय घेतला आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *