Headlines

जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांचा तो दावा खोटा, इराणकडून धक्कादायक खुलासा, थेट..

जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांचा तो दावा खोटा, इराणकडून धक्कादायक खुलासा, थेट..
जगात हाहाकार! डोनाल्ड ट्रम्प यांचा तो दावा खोटा, इराणकडून धक्कादायक खुलासा, थेट..


इराण आणि अमेरिका युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जवळपास सर्वच मुद्द्यांवर सहमती झाली. आता फक्त समोरासमोर बसून चर्चा होणे शिल्लक आहे. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, इराण त्यांचे युरेनियम साठे अमेरिकेला देण्यास तयार आहे. ज्यानंतर इराण अणूबॉम्ब तयार करू शकणार नाही. मात्र, आता इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडून टाकण्यात आला. इराणने स्पष्ट म्हटले की, युरेनियम साठे अमेरिकेने देण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. हे साफ साफ खोटे आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आम्हाला सर्व युरेनियम साठे देणार असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे इराणने याला नकार दिला. यामुळे अजूनही इराण अमेरिका युद्धात स्थिती नक्की काय आहे हे सांगणे कठीणच आहे.

आता इराण अमेरिकेचे काही दावे खोडून काढताना दिसत आहे. पाकिस्तानकडून युद्ध संपवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्थीला हा अत्यंत मोठा झटका म्हणावा लागेल. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या तेहरान भेटीनंतर इराणने स्पष्टपणे केले की, कोणतीही ठोस अशी चर्चा यादरम्यान झाली नाही.

इराणी वृत्तसंस्था तस्नीमच्या वृत्तानुसार, तेहरानने म्हटले आहे की, अमेरिकेने प्रथम आपली आश्वासने पूर्ण करावीत आणि आपल्या ज्याकाही अवास्तव मागण्या आहेत, त्या मागे घ्याव्यात. इराणकडून दिलेल्या स्पष्टीकरणानंतर अमेरिकेसह पाकिस्तानची झोप उडाल्याचे बघायला मिळत आहे. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दावा केला जात आहे की, आम्ही युद्धबंदीच्या खूप जास्त जवळ पोहोचलो आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडून इराणकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली. अगोदर आमच्या मागण्यापूर्ण करा. त्यानंतर अमेरिकेने त्यांच्या मागण्या मागे घ्याव्यात, असे इराणकडून सांगण्यात आले. होर्मुज खाडीत अजूनही तणाव कायम आहे. होर्मुज खाडीतील तणाव कमी व्हावा, ही संपूर्ण जगाची इच्छा आहे. होर्मुज खाडीमुळे जग संकटात आहे. ऊर्जेची समस्या वाढताना दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *