Headlines

नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा,लंडनला पोहचली सीबीआयची टीम, मुंबईच्या आर्थररोडमध्ये केव्हा होणार एण्ट्री ?

नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा,लंडनला पोहचली सीबीआयची टीम, मुंबईच्या आर्थररोडमध्ये केव्हा होणार एण्ट्री ?
नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा,लंडनला पोहचली सीबीआयची टीम, मुंबईच्या आर्थररोडमध्ये केव्हा होणार एण्ट्री ?


देशातून पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला भारत आणण्याच्या दीर्घ प्रयत्नांना अखेर यश मिळ असून हे प्रयत्न आता शेवटच्या टप्प्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सीबीआयची एक स्पेशल टीम नीरव मोदीला भारतात आणण्यासाठी लंडन येथे उपस्थित आहे. भारत सरकारला हे एक मोठे यश म्हटले जात आहे.नीरव मोदी बराच काळ युकेच्या कोर्टात त्याचे प्रत्यार्पण रोखण्यासाठी कायदेशीर लढाई लढत होता.आता बातमी आहे की त्याने ब्रिटनमध्ये उपलब्ध कायद्याच्या सर्व डावपेचांना आजमावून पाहिले असून आता भारतात परतण्याशिवाय कोणतेही गत्यंतर उरलेले नाही.

लंडनमध्य सीबीआयची टीम तैनात असल्याच्या वृत्ताचे स्पष्ट संकेत आहेत की प्रत्यार्पण प्रक्रीया आता ऑपरेशनल फेजमध्ये आहे. याचा अर्थ आता कोणत्याही वेळी नीरव मोदीला विशेष विमानाने भारतात आणले जाऊ शकते. पंजाब नॅशनल बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी हा आता कायद्याच्या कचाट्यात पूर्ण अडकलेला आहे. आता युकेत प्रत्यार्पण विरोधात कोणतीही कायदेशीर अडचण उरलेली नाही. लंडन कोर्टाने नीरव मोदी यांच्या अखेरच्या प्रयत्नांवर पाणी टाकले आहे.

नीरव मोदी याने प्रत्यार्पण रोखण्यासाठी लंडनच्या हायकोर्टात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. त्याने भारतातील तुरुंगातील दैनावस्था आणि मानवी अधिकारांचा हवाला देत वाचण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. कोर्टाने भारत सरकारने दिलेल्या आश्वासनांना स्वीकार करत त्याच्या सर्व दाव्यांना फेटाळून लावले. मार्च २०२६ च्या अखेर कोर्टाच्या कठोर धोरणाने अखेर नीरव मोदी याला भारतात पाठवण्याचे निश्चित झाले. सीबीआयची टीम आता ब्रिटीश अधिकाऱ्यांसोबत मिळून कागदोपत्री कारवाई आणि सुरक्षेच्या उपयांना अंतिम स्वरुप देत आहे.

आर्थर रोडमध्ये काय तयारी ?

नीरव मोदी याला भारतात आणल्यानंतर मुंबईतील आर्थररोड तुरुंगाच्या बॅरक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येईल असे म्हटले जात आहे. भारत सरकारने ब्रिटीश कोर्टाला नीरव मोदी याला येथे सर्व आवश्यक सुविधा आणि सुरक्षा पुरविली जाईल असे आश्वस्थ केले आहे. सीबीआयच्या सूत्रांनुसार भारतात आणताच त्यांना विशेष कोर्टात सादर केले जाईल. त्यानंतर पीएनबी घोटाळ्या संदर्भातील मनी लाँड्रींग आणि फसवणूक प्रकरणातील खटल्याची सुनावणी वेगाने घेतली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *