Headlines

बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल…युद्धाचा मोठा फटका!

बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल…युद्धाचा मोठा फटका!
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल…युद्धाचा मोठा फटका!


आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती, डिझेलच्या वाढत्या किमती, पाणीटंचाई आणि पीओपीच्या दरवाढीमुळे मूर्तिकारांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्ती 20 ते 30 टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या पीओपीच्या एका बॅगेसाठी मूर्तिकारांना पूर्वीपेक्षा सुमारे 50 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. तसेच रंग, सजावटीचे साहित्य आणि वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. पाणीटंचाईमुळे अनेक मूर्तिकारांना टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत असल्याने खर्चात आणखी भर पडत आहे.

वाढत्या महागाईमुळे मूर्तिकार आर्थिक अडचणीत सापडले असून ग्राहकांकडूनही दरवाढीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक आणि लहान मूर्तींकडे नागरिकांचा कल वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *