Headlines

मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट सस्पेंड!

मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट सस्पेंड!
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट सस्पेंड!


सध्या सगळीकडे कॉकरोच जनता पार्टीची चर्चा आहे. या इंस्टाग्राम अकाउंटचा संस्थापक एक मराठी तरुण आहे. एका सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे सध्या अभिजीत दीपके चर्चेत आले आहेत. अभिजीत हे महाराष्ट्रातील आहेत. त्यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली आणि त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली. पाच दिवसांत त्यांच्या इन्स्टाग्रामवर 10 मिलियनहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

या बाबतची एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांचे ट्विटर खाते सध्या सस्पेंड करण्यात आले आहे. अभिजीत दीपके हे सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनले आहेत. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. या पार्टीच्या माध्यमातून त्यांनी बेरोजगारी आणि सिस्टीमवर सवाल उपस्थित करणारे मीम्स व्हायरल केले आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष प्रसिद्ध झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *