Headlines

रशियाने युद्धात लावली पाकिस्तानची वाट, थेट मोठा प्रस्ताव, पळता भुई कमी, जगात..

रशियाने युद्धात लावली पाकिस्तानची वाट, थेट मोठा प्रस्ताव, पळता भुई कमी, जगात..
रशियाने युद्धात लावली पाकिस्तानची वाट, थेट मोठा प्रस्ताव, पळता भुई कमी, जगात..


इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थी करण्याकरिता अनेक देश पुढे आली. मात्र, अजून कोणाला यश मिळाले नाही. इराणला मदत करत असल्याचा आरोप रशियावर होत आहे. अमेरिकेने थेट रशियाचे नाव घेतले होते. आता रशियाकडून इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. हा पाकिस्तानला मोठा झटका रशियाने दिला. अमेरिका आणि इराण युद्धात काही दिवसांपासून पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. पण त्यांना यश मिळत नाही. पहिली बैठकही पाकिस्तानमध्ये झाली पण तोडगा निघू शकला नाही. पाकिस्तानकडून काहीही होणार नसल्याचे जगाच्या लक्षात आल्यानंतर रशियाने युद्धात मध्यस्थीचा प्रस्ताव दिला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा करून मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला. पाकिस्तानच्या मध्यस्थीला इराण आणि इस्त्रायलचा विरोध अगोदरपासूनच होता. लावरोव्ह यांनी प्रदेशातील सुरू असलेला संघर्ष अधिक चिघळू नये, यावर भर दिला.

गेल्या काही तासात परिस्थिती चिघळताना दिसत आहे. मध्य पूर्वेतील युद्ध पेटू नये, याकरिता रशियाकडून हे मोठे पाऊल उडलण्यात आले. हेच नाही तर इराणकडून रशियाला आश्वासन देण्यात आले की, होर्मुज खाडीत रशियाच्या जहाजांना विशेष सुरक्षा पुरवली जाईल. इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, आम्ही रशियाच्या जहाजांना होर्मुज खाडीत सुरक्षित रस्ता देणार आहोत.

होर्मुज खाडी रशियासाठी सुरक्षित असल्याचे इराणकडून जाहीर करण्यात आले. रशियासाठी होर्मुज खाडी सुरक्षित म्हणजे भारताचा मोठा फायदा आहे. भारतात रशिया या वाईट काळात मोठ्या प्रमाणात कच्चे तेल पाठवत आहे. युद्धाच्या परिस्थितीत भारताच्या मदतीला रशिया धावून आला. रशियाच्या मध्यस्थीसाठी इराण तयार आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात रशिया सहभागी नाही, पण इराणला मदत करत असल्याचा रशियावर आरोप आहे. गुप्तचर माहिती, भौतिक साहाय्य रशिया करत असल्याचे सांगितले जात आहे. हेच नाही तर उपग्रह फोटोही रशिया इराणला देत असल्याचा आरोप आहे. पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारची मध्यस्थी होत नसल्याने आता भारताचा मित्र मध्यस्थी करण्यासाठी मैदानात उतरत असल्याचे बघायला मिळत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *