
मोठ्या वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाचा मोठा फटका इंडिगोच्या विमानाला बसला आहे. थेट इंडिगोच्या विमानावर वीज कोसळली. कोलकाता विमानतळावर ही घटना घडली.
कोलकातामध्ये आलेल्या तीव्र वादळाच्या वेळी इंडिगोच्या एका विमानावर वीज पडली. ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले.
ही घटना विमान आगरतळासाठी उड्डाण करण्याच्या तयारीत असताना घडली. या घटनेनंतर विमान काही विमानतळावरच थांबले. विमानाचे लाईट बंद झाले.
या घटनेत बाधित झालेल्या इंडिगोच्या दोन कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पीटीआयला सूत्रांनी सांगितले की, विमानात असलेल्या सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने आगरतळ्यास नेण्यात आले.
ही घटना इंडिगोच्या एअरबस A320neo सोबत घडली. विमानात प्रवाशांना बसवण्यात आले. उड्डाण करत असतानाच विमानावर विज कोसळली. या विमानात सर्व कर्मचारीवर्गासह 140 हून अधिक लोक होते.