Headlines

ॲमेझॉनवर Redmi Turbo 5 ची विक्री सुरू, मिळवा 2 हजार रुपयांची बँक कार्ड सवलत

ॲमेझॉनवर Redmi Turbo 5 ची विक्री सुरू, मिळवा 2 हजार रुपयांची बँक कार्ड सवलत
ॲमेझॉनवर Redmi Turbo 5 ची विक्री सुरू, मिळवा 2 हजार रुपयांची बँक कार्ड सवलत


रेडमी टर्बो 5 या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. तर भारतीय बाजारात रेडमी स्मार्टफोनची विक्री 19 जूनपासून सुरू झाली आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मोठी बॅटरी, 100 वॉट फास्ट चार्जिंग, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 12 जीबी व्हर्च्युअल रॅम, अमोलेड डिस्प्ले आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंग यांचा समावेश आहे. तसेच या हँडसेटला कंपनीकडून सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स आणि चार वर्षांचे ओएस अपग्रेड्स मिळतील. या फोनची किंमत 37 हजार ते 41 हजार रूपयांच्या दरम्यान आहे, परंतु बँक कार्डचा वापर करून तुम्ही हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला 2 हजार रूपयांची सवलतीचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनबद्दल अधिक जाणून घेऊयात.

रेडमी टर्बो 5 ची किंमत

या फोनच्या 8GB रॅम/256GB व्हेरिएंटची किंमत 37 हजार 999 रूपये आहे, आणि 12GB रॅम/256GB व्हेरिएंटची किंमत 40 हजार 999 रूपये इतकी आहे. तुमच्याकडे जर ॲक्सिस, एसबीआय किंवा आयसीआयसीआय बँकेचे कार्ड असल्यास या कार्डद्वारे तुम्ही मोबाईल फोन खरेदी केल्यास तुम्हाला 2 हजार रूपयांची त्वरित सूट मिळेल. हा नवीन रेडमी फोन कंपनीच्या वेबसाइट, Mi.com, ॲमेझॉन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येईल.

रेडमी टर्बो 5 ची वैशिष्ट्ये

ऑपरेटिंग सिस्टम: ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3 वर चालतो.

स्क्रीन: या रेडमी फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 2560Hz टच सॅम्पलिंग रेट असलेला 6.59-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशन स्क्रीन, 3500 nits पीक ब्राइटनेस आणि स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 7i आहे.

प्रोसेसर: या नवीनतम स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

रॅम: फोनमध्ये 8/12 असे दोन रॅम पर्याय आहेत, पण 12 जीबी व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने तुम्ही रॅम 24 जीबीपर्यंत वाढवू शकाल.

कॅमेरा: मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सोबत 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा. 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी: या रेडमी फोनमध्ये 7540mAh क्षमतेची बॅटरी असून 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *