
इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान लुडबुड करत आहे. पाकिस्तानचे नक्की काय सुरू आहे, हे जगालाही कळण्यास मार्ग नाही. इस्लामाबाद शहरात अत्यंत हैराण करणारे निर्णय घेतली जात आहे. एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार बैठकीच्या कोणत्याही चालचाली सुरू नाहीत. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने पूर्ण इस्लामाबादमध्ये लॉकडाऊन लावून टाकले. युद्धबंदी करार बैठक पाकिस्तानमध्ये असल्याने आम्ही खूप काही मोठे मिळवले आहे, असे सरकारकडून मिरवले जात आहे. इराण आणि अमेरिकेकडून पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांतता करार बैठकीबद्दल कोणतेही अपडेट नाही. बैठक होणार की, नाही याबद्दलही या देशांनी भूमिका घेतली नाही. हेच नाही तर इराणकडून स्पष्ट सांगण्यात आले की, ते अमेरिकेसोबत कोणत्याही मंचावर बसणार नाहीत. मात्र, पाकिस्तानने इस्लामाबादला या बैठकीसाठी रेड झोन घोषित केले.
सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले. हेच नाही तर शाळा आणि महाविद्यालयाने सुट्टी जाहीर करण्यात आली. रस्त्यांवर सुकसुकाट आहे. मात्र, या बैठकीचे प्रमुख असलेल्या इराणनेच बैठकीस येण्यास नकार दिला. मात्र, पाकिस्तान सरकार जिद्दवर अडून बसले आहे. रेड झोनमध्ये मोठ्या संख्येने सैनिकांना तैनात करण्यात आले. मात्र, यामुळे पाकिस्तानी नागरिक वैतागले आहे.
पाकिस्तानमध्ये होणारी बैठक होणार की नाही, हेच स्पष्ट नाही पण पाकिस्तान जगात गाझा वाझा जोरदार करत आहे. पाकिस्तानवरील कर्जाचा डोंगर वाढला आहे. यूएईने पाकिस्तानला पैसा परत मागितला आहे. पाकिस्तानचे खाण्याचे वांदे आहेत आणि इराण आणि अमेरिका युद्धात मध्यस्थी करण्यासाठी निघाला आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती जगापासून काही लपून राहिलेली नाही. पण पाकिस्तान फक्त दिखावेगिरी करण्यास व्यस्त आहे.
पहिली बैठक पाकिस्तानमध्ये पार पडली. मात्र, त्यात यश मिळाले नाही. आता दुसरी बैठकही पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानने कंबर कसली आहे. पण इराण येण्यास तयार नाही. अमेरिकेनेही यावर भाष्य केले नाही. होर्मुज खाडीत तणाव प्रचंड वाढला आहे. पाकिस्तानमध्ये स्थिती गंभीर होताना दिसत आहे.