Headlines

सुपरहिट गाणं असणारा 56 वर्षे जुना चित्रपट, ज्याच्या शूटिंगवेळी राजेश खन्नावर चाहत्यांनी केली होती दगडफेक, बंद करण्यात आलेलं शूटिंग

सुपरहिट गाणं असणारा 56 वर्षे जुना चित्रपट, ज्याच्या शूटिंगवेळी राजेश खन्नावर चाहत्यांनी केली होती दगडफेक, बंद करण्यात आलेलं शूटिंग
सुपरहिट गाणं असणारा 56 वर्षे जुना चित्रपट, ज्याच्या शूटिंगवेळी राजेश खन्नावर चाहत्यांनी केली होती दगडफेक, बंद करण्यात आलेलं शूटिंग


Rajesh Khanna : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना यांची लोकप्रियता आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. त्यांच्या अभिनयाची शैली, संवादफेक, चेहऱ्यावरील भाव आणि पडद्यावरील रोमँटिक अंदाज यामुळे लाखो प्रेक्षक त्यांचे चाहते बनले होते. विशेषतः महिला चाहत्यांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ होती. राजेश खन्नांची एक झलक पाहण्यासाठी लोक तासन्तास वाट पाहत असत. मात्र, त्यांच्या लोकप्रियतेमुळे एकदा चित्रपटाच्या सेटवर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की संतप्त चाहत्यांनी दगडफेकही केली होती.

1970 मध्ये प्रदर्शित झालेला ‘कटी पतंग’ हा चित्रपट राजेश खन्नांच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात त्यांच्यासोबत आशा पारेख मुख्य भूमिकेत होत्या. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

अलीकडेच आशा पारेख यांनी चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘जिस गली में तेरा घर ना हो’ च्या चित्रीकरणाशी संबंधित एक आठवण सांगितली. त्यांनी सांगितले की या गाण्याचे शूटिंग नैनीतालमध्ये सुरू होते. गाण्यातील एका सीनसाठी राजेश खन्नांना बोटीत बसून तलावाच्या दिशेने जायचे होते. मात्र, त्यावेळी त्यांच्या चाहत्यांची एवढी मोठी गर्दी जमली होती की कलाकारांना बोटीपर्यंत पोहोचणेही कठीण झाले होते.

चाहत्यांना भेटता न आल्याने वाढला संताप

आशा पारेख यांच्या मते, सेटवर हजारोंच्या संख्येने चाहते जमा झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव राजेश खन्ना कोणालाही भेटू शकले नाहीत. त्यामुळे अनेक चाहते नाराज झाले. परिस्थिती हळूहळू बिघडत गेली आणि काही संतप्त लोकांनी दगडफेक सुरू केली.

या घटनेची आठवण सांगताना आशा पारेख म्हणाल्या की, ‘आमच्या दिशेने इतके दगड फेकले जात होते की नेमके काय घडत आहे, हेच आम्हाला समजत नव्हते. अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण चित्रपट युनिट अडचणीत सापडले.’

दिग्दर्शकांना थांबवावी लागली शूटिंग

सेटवरील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शकांना शूटिंग थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. कलाकार आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्या दिवसाचे चित्रीकरण रद्द करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या पोलीस बंदोबस्तात पुन्हा शूटिंग करण्यात आले आणि गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *