Headlines

9 वर्षाच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या कृत्यानं पुणे पुन्हा हादरलं… नेमकं काय घडलं?

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरातील धक्कादायक हत्या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पाठोपाठच आता पुण्यात आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. आजोबा अन् नात या प्रेमळ नात्याला काळिमा फासणाऱ्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका 50 वर्षीय आजोबाने स्वतःच्याच मुलीच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित प्रकरणातील पीडित मुलगी अवघ्या नऊ वर्षाची आहे.

ही घटना घडत असताना स्थानिक नागरिकांनी वेळीच लक्ष देत त्या मुलीची सुटका केली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतलं. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून शेकडो लोक रस्त्यावर उतरले. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या लाजिरवाण्या कृत्यामुळे लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *