Headlines

इराणच्या युद्धात कोणत्या देशाचे सर्वाधिक नुकसान ? होर्मुझ स्ट्रेट बंद आणि पर्यटन ठप्प झाल्याने आर्थिक आणीबाणी

इराणच्या युद्धात कोणत्या देशाचे सर्वाधिक नुकसान ? होर्मुझ स्ट्रेट बंद आणि पर्यटन ठप्प झाल्याने आर्थिक आणीबाणी
इराणच्या युद्धात कोणत्या देशाचे सर्वाधिक नुकसान ? होर्मुझ स्ट्रेट बंद आणि पर्यटन ठप्प झाल्याने आर्थिक आणीबाणी


इराणवर इस्राईल-US ने युद्ध छेडल्यानंतर या युद्धात काही संबंध नसताना सर्वाधिक जास्त नुकसान युएई आणि सौदी अरबचे झाले आहे. ताजा आकडेवारीने या संबंधी माहिती उघड झाली आहे. सौदी अरबचे ऊर्जा आणि पर्यटन विभागाचे किमान ५ अब्ज डॉलरचे नुकसान या युद्धाने झाले आहे. याच प्रकारे युएईचे देखील सुमारे ५ अब्ज डॉलरचे नुकसान आतापर्यंत झाले आहे. या दोन देशानंतर कतार आणि इराकचे नुकसान झाले आहे. मात्र, इराक हा आखाती देश नाही.

फायनान्शियल टाईम्सच्या मते इराण युद्धामुळे आखाती देशाचा ऊर्जा महसुलाचे सुमारे १५.१ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक जास्त सौदीला ४.५ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. सौदीची सर्वात मोठी तेल कंपनी अरमाको युद्धामुळे ठप्प झाली आहे.

इराण युद्धाने कोणाला किती नुकसान ?

1. फायनान्शियल टाईम्सच्या मते सौदी अरबला ४.५ अब्ज डॉलर ऊर्जा महसुलाचे नुकसान झाले आहे. या प्रकारे कतारला ०.५ अब्ज डॉलरचे नुकसान झाला आहे. कुवैत, बहारीन आणि युएईला सुमारे १० अब्ज डॉलरचे ऊर्जा महसुलाचे नुकसान झाले आहे. हे नुकसान होर्मुज स्ट्रेटच्या बंद झाल्याने झाले आहे. आखाती देशातून संपूर्ण जगाला इंधनाची निर्यात केली जाते.

2. इराणच्या युद्धामुळे सर्वात जास्त आखाती देश युएईत सर्वसामान्यांचे मृत्यू झाले आहे. युएईत आतापर्यंत १२, कुवैतमध्ये ८, बहारीनमध्ये २, सौदीत २ नागरिकांचा मृ्त्यू झाल्याची बातमी आहे. कतारमध्ये एकाही नागरिकांचा या युद्धात मृत्यू झालेला नाही. इराकचे ५९ नागरिक या युद्धात ठार झाले आहेत.

3. इराण युद्धाने पर्यटन उद्योगाचे देखील खुप नुकसान झाले आहे. टुरिझम एजन्सीच्या वृत्तानुसार युएईला सर्वाधिक २.५ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. याच प्रकारे सौदी अरबला देखील २ अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.या नंतर कतार सारख्या देशाचे नुकसान झाले आहे.

यु्द्धासाठी अमेरिकेने किती रुपये खर्च केले ?

अमेरिकन संरक्षण मंत्रालय पेंटागनच्या अंदाजानुसार युद्धाच्या सुरुवातीच्या १० दिवसात अमेरिकेला ११ अब्ज डॉलरचा दारुगोळा खर्च केला आहे. अमेरिका इस्राईलसोबत मिळून इराणवर हल्ला करत आहेत. इस्राईलने आतापर्यंत किती रुपयांचा दारुगोळा खर्च केला याची माहिती अद्याप उघडकीस आलेली नाही.

अमेरिका आणि इस्राईलच्या हल्ल्यात आता पर्यंत इराणच्या २००० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनेई सह ४० टॉप कमांडर ठार झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *