Headlines

Ashok Kharat : महिलांच्या लैंगिक शोषणानंतर लिंगपिसाट खरातवर हत्येचा आरोप?, कुणाच्या भावाची झाली हत्या? कुणी केला आरोप? नव्या दाव्याने मोठी खळबळ

Ashok Kharat : महिलांच्या लैंगिक शोषणानंतर लिंगपिसाट खरातवर हत्येचा आरोप?, कुणाच्या भावाची झाली हत्या? कुणी केला आरोप? नव्या दाव्याने मोठी खळबळ
Ashok Kharat : महिलांच्या लैंगिक शोषणानंतर लिंगपिसाट खरातवर हत्येचा आरोप?, कुणाच्या भावाची झाली हत्या? कुणी केला आरोप? नव्या दाव्याने मोठी खळबळ


नाशिक सिन्नरमधील मिरगाव येथील तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला महिलेचं लैंगिक शोषण, अत्याचाराच्या गंभीर आरोपावरून अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात त्याच्या अटकेनंतर बरीच धक्कादायक माहिती समोर आली असून अशोक खरातचे 58 आक्षेपार्ह व्हिडीओ देखील असल्याचे उघड झालं. त्यानंतर आता अनेक महिला समोर आल्या असून अशोक खरातवर आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्याने अनेक महिलांचं शोष केलं, त्यांना ब्लॅकमेल केलं, एका महिलेला तर त्याने लग्नाचं आश्वासन देऊन भुलवलं आणि तिचं शारीरिक शोषण केलं, त्यातून ती गर्भवती राहिली होती हेही उघड झालं. तसेच त्याने राजकीय कनेक्नशनचा वापर करत अनेक जमिनी लटल्या, फसवणूक केल्याचंही समोर आलं असून त्याचा पाय चांगलाच खोलात गेल्याच आढळलं आहे.

हे सगळं कमी की काय म्हणून आता अशोक खरात याच्यावर हत्येचाही आरोप करण्यात आला आहे. भोंदू बाबा अशोक खरातने माझ्या भावाची हत्या केली असा धक्कादाय आरोप नाशिकजवळच्या गावातील शेतकरी विलास जाधव यांनी लावला आहे. आम्ही पोलिसांकडे तक्रार देखील केली. मात्र भोंदू बाबा खरातचे मोठ्या लोकांशी संबंध असल्याने कारवाई झाली नाही, असाही दावा त्याने केला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

खरातने केली भावाची हत्या

नाशिकच्या गवळाने गावातील शेतकरी विलास जाधव यांनी भोंदूबाबा खरात याच्यावर, आपल्या भावाच्या हत्येचा गंभीर आरोप केला आहे. जमिनीच्या वादावर न्यायालयाचा निर्णय येण्यााच्या दोन दिवस आधीच भावाचा संशयास्पदरित्या अपघाती मृत्यू झाला, असा दावा त्यांनी केला.

2012 साली एक जागा आम्हाला खरेदी करता आली नाही . कॅप्टन खरात याला ही बाब कळाली, त्याने परस्पर या जमीना मालकाला उचललं आणि ती जमीन खरेदी करून घेतली, असा आरोप जाधव यांनी केला. त्यानंतर माझ्या भावाने खरातला जाब विचारला, तेव्हा त्याने मुजोरपणे उत्तर दिलं. तुम्ही कोर्टात जा, कोर्टाकडून न्याय मागा असं तो म्हणाला. त्यानंतर माझ्या भावाने कोर्टात अर्ज केला, केस लढली. 2022 साली त्यावर स्टे येणार होता, पण 17 डिसेंबर 2022 रोजी माझ्या भावाचं अपघाती निधन झालं. पण तो काही अपघात नव्हता, तर तो घातपात आहे, असा आम्हाला संशय आहे, असं विलास जाधव म्हणाले. त्यांनी खरातवरच हत्येचा आरोप लावला आहे.

एकीकडे खरात याच्यावर महिलांवर अत्याचाराचा आरोप असून आता हत्येचाही आरोप करण्यात आला आहे, आता जाधव यांच्या या आरोपामुळे खरात याच्या अडचणी आता वाढू शकतात.

https://www.youtube.com/watch?v=e6FSqdAQPsE



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *