Headlines

Ashok Kharat: दैवी शक्तीचा आव, शैतान अशोक खरातचे मोठे कांड, विद्यार्थिनीवर… नव्या तक्रारीने प्रकरण अधिक गंभीर, बाबाचे ग्रह फिरले

Ashok Kharat: दैवी शक्तीचा आव, शैतान अशोक खरातचे मोठे कांड, विद्यार्थिनीवर… नव्या तक्रारीने प्रकरण अधिक गंभीर, बाबाचे ग्रह फिरले
Ashok Kharat: दैवी शक्तीचा आव, शैतान अशोक खरातचे मोठे कांड, विद्यार्थिनीवर… नव्या तक्रारीने प्रकरण अधिक गंभीर, बाबाचे ग्रह फिरले


Nashik Ashok Kharat : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. अनेक महिला त्याच्या लैंगिक छळाला बळी पडल्या आहेत. दमदाटी करून त्याने अनेक जमिनी लाटल्याचे समोर आले आहे. या खरातचे अजून मोठे कांड समोर येत आहेत. त्याच्याविरोधात अजून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्यांची संख्या आता 6 इतकी झाली आहे. त्याची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याची चौकशी करायची असल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती करण्यात येणार आहे.

अजून तीन नवीन गुन्हे दाखल

नाशिक येथील भोंदू अशोक खरातविरोधात आणखी तीन नवे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्याविरोधातील एकूण गुन्ह्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. कार्यालयातच महिलांचा तो लैंगिक छळ करायचा. त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. त्यातील अनेक महिला भीतीपोटी आणि सामाजिक दबावापोटी अद्यापही समोर येत नसल्याचे समोर येत असल्याने पोलिसांनी एक खास हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. त्यावर महिलांना संपर्क साधता येईल. अथवा ज्यांना त्याविषयीची खात्रीलायक माहिती आहे. त्यांना संपर्क साधता येईल.

विद्यार्थिनीवरही खरातचा अत्याचार

नराधमाने विद्यार्थिनीला देखील सोडले नाही.अत्याचाराचे गंभीर आरोप खरातविरोधात आहेत. महिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. लग्न, धार्मिक विधी व तंत्र-मंत्राच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप करण्यात येत आहे. अमानुष लैंगिक अत्याचार केल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत. जमिनी खरेदी व्यवहारात मोठी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाथर्डी परिसरातील सुमारे २५ एकर जमीन व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा शेतकर्‍यांचा दावा आहे.

आता खूनाचा गुन्हा दाखल होणार?

आता फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांची जमीन परत देण्याची मागणी केली आहे. खरात याची पोलिस कोठडीची मुदत आज संपत आहे. आज या नराधमाला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पुन्हा पोलिस कोठडी मागण्याची शक्यता आहे. तर खरात याच्यावर मारहाणीचा नवा आरोप करण्यात आला आहे. त्याने वादातून एका व्यक्तीला संपवल्याची तक्रार देण्यात आली आहे. नव्या तक्रारींमुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. त्याच्यावर आता खूनाचा गुन्हा दाखल होणार का, अशी चर्चा समोर येत आहे. आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळते, की पोलीस कोठडी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *