
आयपीएल 2026 चा सीजन आजपासून सुरु होतोय. अनेक टीम्समधील दुखापतग्रस्त खेळाडू खेळणारं की नाही या बद्दल चित्र स्पष्ट नाहीय. सीजनचा पहिला सामना गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणार आहे. SRH आपल्या स्टार गोलंदाजाशिवाय मैदानात उतरणार आहे. अशीच चिंता पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्स टीमला सुद्धा आहे. त्यांच्यासाठी चिंतेचं कारण स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह होता. तो पहिल्या सामन्यात खेळणार की नाही?. पण मॅचला 48 तास उरले असताना मुंबई इंडियन्सची चिंता दूर झाली आहे. बुमराह मॅच खेळण्यासाठी फिट आहे.
28 मार्च म्हणजे आजपासून आयपीएलचा 19 वा सीजन सुरु होत आहे. पहिला सामना RCB विरुद्ध SRH मध्ये आहे. सीजनचा दुसरा सामना रविवारी 29 मार्चला मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये होणार आहे. ही मॅच मुंबई टीमचं होमग्राऊंड वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मॅचच्या तीन दिवस आधी बुमराह टीममध्ये सहभागी झाला नव्हता. अचानक तो बंगळुरुच्या BCCI सेंटर ऑफ एक्सीलेंस (CoE) मध्ये गेला होता. त्यामुळे बुमराहच्या दुखापतीची चिंता वाढली होती.
अखेरीस टीममध्ये दाखल झालाय
आता मुंबई आणि त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. बुमराहचा अखेरीस टीममध्ये समावेश झालाय. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार शुक्रवारी 27 मार्चच्या संध्याकाळी बुमराह मुंबई इंडियन्सची टीम उतरलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाला. आता तो पहिला सामना खेळण्याची शक्यता वाढली आहे. 8 मार्च रोजी झालेल्या वर्ल्ड कप 2026 फायनलपासून बुमराहने ब्रेक घेतला होता.
मुंबई इंडियन्ससाठी ही चांगली बातमी
मुंबई इंडियन्सने वर्ल्ड कप फायनल खेळलेल्या आपल्या खेळाडूंना एक्स्ट्रा ब्रेक दिला होता. पण कॅप्टन हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा आधीच टीममध्ये परतले होते. बुमराह अचानक CoE मध्ये गेला. तिथे तो 5 दिवस होता. त्यामुळे भिती वाढली होती. त्याला दुखापत तर झाली नाही ना, अशी चिंता वाटत होती. पण असं काही नाहीय. त्याचं तिथे जाणं रुटीन प्रक्रियेचा भाग होतं. बुमराह संपूर्ण आयपीएलचा सीजन उपलब्ध असेल. सहाव्यांदा आयपीएल विजेतेपदावर लक्ष असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी ही चांगली बातमी आहे.