Headlines

मध्यरात्री या अभिनेत्रीसह तिच्या बहिणीसोबत गैरवर्तन, दिव्या सुरेशचा पोलिसांवर गंभीर आरोप

मध्यरात्री या अभिनेत्रीसह तिच्या बहिणीसोबत गैरवर्तन, दिव्या सुरेशचा पोलिसांवर गंभीर आरोप
मध्यरात्री या अभिनेत्रीसह तिच्या बहिणीसोबत गैरवर्तन, दिव्या सुरेशचा पोलिसांवर गंभीर आरोप


कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस कन्नड’ची माजी स्पर्धक दिव्या सुरेश हिने बंगळुरूमधील एका धक्कादायक घटनेबाबत गंभीर आरोप केला आहे. रविवारी उशिरा रात्री ती आणि तिची चुलत बहीण घरी परतत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा रस्त्यावर पाठलाग करत अश्लील कृत्य केल्याचा दावा तिने केला आहे. या घटनेनंतर दिव्याने सोशल मीडियावर आपला संताप आणि भीती व्यक्त करत शहरातील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दिव्या सुरेशने सांगितले की, ही घटना रविवारी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. ती आणि तिची चुलत बहीण कारकडे जात असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करू लागला. त्याचवेळी तो सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करत होता. त्यांनी त्या व्यक्तीला तात्काळ जाब विचारला, मात्र त्याने आपले कृत्य थांबवले नाही. उलट दोघी कारमध्ये बसून निघून जाईपर्यंत तो त्यांचा पाठलाग करत राहिला असा दावा अभिनेत्रीने केला आहे.

या घटनेनंतर दिव्याने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, फक्त रात्री बाहेर फिरत असल्यामुळे कोणत्याही महिलेला अशा प्रकारच्या छळाचा सामना करावा लागू नये. महिलांच्या सुरक्षेचे जे आश्वासन दिले जाते ते नेमके कुठे आहे? तिने आपल्या पोस्टमध्ये बंगळुरू पोलिसांनाही टॅग करत सार्वजनिक सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले.

व्हिडीओमध्ये काय?

दिव्याने या घटनेचा एक व्हिडिओही इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना दिसते. तिची चुलत बहीण त्या व्यक्तीकडे बोट दाखवत त्याच्या अश्लील वर्तनाची नोंद घेत असल्याचेही दिसते. व्हिडिओमध्ये दिव्या सांगते की, हा माणूस आम्ही कारमध्ये बसेपर्यंत आमचा पाठलाग करत राहिला. माझ्या चुलत बहिणीने मला तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. मात्र, इन्स्टाग्राम स्टोरीची 24 तासांची मुदत संपल्यामुळे हा व्हिडिओ आता उपलब्ध नाही.

या कथित घटनेबाबत अद्याप बंगळुरू पोलिसांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत माहिती समोर येणे अद्याप बाकी आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *