Headlines

Farmer Loan Waiver: 56 लाख शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, या दिवशी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, सहकार विभागाचे आवाहन काय?

Farmer Loan Waiver: 56 लाख शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, या दिवशी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, सहकार विभागाचे आवाहन काय?
Farmer Loan Waiver: 56 लाख शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता, या दिवशी खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार, सहकार विभागाचे आवाहन काय?


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६

Farmer Loan Waiver: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मंजूर झाली आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना 5 जुलैपासून योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी सोमवारी विधानसभेत दिली आहे. पण प्रत्यक्षात ही रक्कम जमा होण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

30 जूनची तारीख ढकलली पुढे

महायुती सरकार 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे दोन लाखांचे कर्ज माफ करणार आहे. या महिन्यात 2 जून रोजी त्याला मंजूरी देण्यात आली होती.  30 जून रोजीपूर्वी शेतकरी कर्जमाफी देण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिले होते. तर काल विधानसभेत पुरवणी मागण्यावर बोलताना त्यांनी एक माहिती दिली. त्यानुसार कर्जमाफीच्या रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. पुरवणी मागण्या मंजूर झाल्यानंतर त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी अद्याप बाकी असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे 5 जुलैनंतर कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचे समोर येत आहे. पण प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अजून काही दिवस लागतील, असा अंदाज आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना जवळपास 36 हजार 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.

सहकार विभागाचे आवाहन काय?

या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांना कोणताही अर्ज करण्याची गरज नाही. पण बँकेतील आधार माहिती देणे गरजेचे आहे.

आधार पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा होईल.

सहकार आयुक्त आणि निबंधकांनी जिल्हा बँकेसह सहकारी बँका, व्यापारी बँकांना शेतकऱ्यांचे आधार क्रमांक अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण शेतकऱ्यांनीही त्यांचे आधार प्रमाणीकरण केले की नाही हे तपासणे आवश्यक आहे.

योजनेच्या अंमलबाजवणीसाठी मंत्रिगट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे. या योजनेचा आढावा घेणे आणि योजनेच्या निकषात बदल करण्यासाठी हा मंत्रिगट काम करणार आहे. समितीत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल, वैद्यकीय शिक्षण, कृषी आणि सहकार मंत्र्यांचा समावेश आहे. ही समिती या योजनेचा नियमित आढावा घेईल. हा मंत्रिगट कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभाविषयी सातत्याने आढावा घेईल. 2019 मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकर्‍यांनाही त्याचा लाभ होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *