Headlines

Ashok Kharat : खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर, व्यापाऱ्याने आपलं घर तपासलं अन् पायाखालची जमीनचं सरकली…

Ashok Kharat : खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर, व्यापाऱ्याने आपलं घर तपासलं अन् पायाखालची जमीनचं सरकली…
Ashok Kharat : खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर, व्यापाऱ्याने आपलं घर तपासलं अन् पायाखालची जमीनचं सरकली…


अशोक खरात प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजत आहे. अशोक खरात याच्याविरोधात एका महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केली आणि त्याचं बिंग फुटलं. चौकशीमध्ये अशोक खरात  याचे एक -एक काळे कारनामे समोर येत आहेत. यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत, दरम्यान आता आणखी एक प्रकरण समोर आलं असून, यामुळे खळबळ उडाली आहे. भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. महिला अत्याचार, अनाधिकृत मालमत्तेनंतर आता त्याच्यावर फसवणुकीचा देखील गुन्हा दाखल झाला आहे.

नेवासा येथील व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खरात विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रत्न बसवून देतो असं सांगत खरात याने वापाऱ्याजवळच्या 20 ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या लांबवल्याचा, आणि त्याबदल्यात बनावट अंगठ्या दिल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2022 मध्ये या व्यापाऱ्याची  खरात याच्या नाशिक येथील ओकस प्रॉपर्टी डेव्हलपर्स कार्यालयात खरातसोबत भेट झाली होती.

दरम्यान आता खरातविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर या व्यापाऱ्याने आपल्या घरातील रत्न बसवलेल्या अंगठ्याची तपासणी केली. तपासणीमध्ये या अंगठ्या बनावट असल्याचं समोर आलं आहे. खरातने या व्यापाऱ्याची तब्बल साडेपाच लाखांची फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच व्यापारी राजेंद्र भागवत यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.  त्यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशोक खरात विरोधात नाशिकच्या  सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी  

दरम्यान सध्या अशोक खरात हा पोलीस कोठडीमध्ये आहे. त्याला न्यायालयानं 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्या खरात याची पोलीस कोठडी संपणार आहे, त्यानंतर न्यायालय काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत खरातचे अनेक धक्कादायक कारनामे समोर आले आहेत. दरम्यान खरातने 5 नरबळी दिल्याचा संशय आहे, असा दावा देखील सरकारी वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला आहे. तसेच खरात याने अनेक व्यक्तींना कस्तुरी दिली, त्यासाठी त्याने हरणाची शिकार केल्याचा संशय आहे, असंही वकिलांनी न्यायालयात म्हटलं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *