Headlines

Raigad MNS Andolan | हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक…

Raigad MNS Andolan | हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक…
Raigad MNS Andolan | हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक…

मुंबई गोवा महामार्गावरील अनेक सूचना फलक तसेच दिशा दर्शक फलक हिंदी भाषेतून लावलेले आहेत. या वादावर मनसे सैनिक आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. या वेळी मनसेचे उपजिल्हाप्रमुख संदीप ठाकुर यांनी शहर परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांची भेट घेतली.
माध्यमांशी बोलताना संदीप ठाकुर यांनी सांगीतले की, “आमचा हिंदी भाषेला विरोध नाही मात्र येथे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेला कोपऱ्यात ठेवले जात आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही.” तसेच त्यांनी या महामार्गावरील अवजड वाहनांविषयीही भाष्य केले. इतकेच नाही तर महामार्ग सूरु होण्याआधीच टोल बसवले आहेत यावर देखील मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या वादावर रायगड शहर परिवहन विभागाचे अधिकारी काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागले आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *