Headlines

हे आमचे युद्ध नाही… बड्या देशाने अमेरिकेला एकटं पाडलं, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा हादरा

हे आमचे युद्ध नाही… बड्या देशाने अमेरिकेला एकटं पाडलं, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा हादरा
हे आमचे युद्ध नाही… बड्या देशाने अमेरिकेला एकटं पाडलं, डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात मोठा हादरा


इराण आणि अमेरिका यांच्यातीय युद्ध थांबायला तयार नाही, दोन्ही बाजूंना एकमेकांवर भीषण हल्ले होत आहेत. इराण ज्या पद्धतीने प्रतिकार करत आहे त्यामुळे अमेरिका आणि इस्रायलला मोठा फटका बसला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगाची झोप उडालेली आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील बड्या देशांना आखातात आपली लढाऊ जहाजे पाठवण्याची विनंती केली होती. मात्र आतापर्यंत एकही देश यासाठी तयार झालेला नाही. त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल या युद्धात बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे. अशातच आता अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. एका बड्या देशाने युध्दात सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

युकेचा अमेरिकेला दणका

युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केअर स्टारमर यांनी अमेरिकेला मोठा दणका दिला आहे. स्टारमर यांनी स्पष्ट केले की त्यांचा देश इराणविरुद्धच्या युद्धात सहभागी होणार नाही. तसेच आमचे मुख्य उद्दिष्ट खाडी प्रदेशातील तणाव कमी करणे आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणे हे आहे. या युद्धाचा परिणाम आमच्या देशावर होईल, पण UK कडे अधिक सुरक्षित देश म्हणून पुढे येण्याची योजना आहे.

हे आमचे युद्ध नाही

केअर स्टारमर यांनी सांगितले की, ‘हे आमचे युद्ध नाही आणि आम्ही या वादात पडणार नाही. आम्हाला तणाव कमी करायचा आहे आणि होर्मुज सामुद्रधुनी पुन्हा सुरू करायची आहे. या युद्धाचा परिणाम होणार असला तरी ब्रिटेनकडे अधिक सुरक्षित देश म्हणून बाहेर पडण्याची योजना आहे. युकेने खाडी परिसरातील सागरी सुरक्षेला चालना देण्यासाठी 35 देशांना एकत्र आणून संयुक्त निवेदन दिले आहे. याबाबत बोलताना स्टारमर यांनी, ‘आम्ही या देशांच्या बैठकीचे आयोजन करू. आम्ही लष्करी नियोजकांशी चर्चा करून या सामुद्रधुनीला कसे सुरक्षित करता येईल याचे मूल्यांकन करू. मात्र, हे सोपे नसेल अशी माहिती दिली आहे.

35 देश एकत्र

ब्रिटनने 35 देशांना एकत्र आणून सागरी सुरक्षेसाठी संयुक्त उपक्रम सुरू केला आहे आणि लवकरच बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. ब्रिटिश पंतप्रधानांच्या मते, लष्करी नियोजकांसोबत मिळून होर्मुज सामुद्रधुनी सुरक्षित करण्यावर चर्चा होणार आहे. यामुळे जागतिक स्तरावर तेलपुरवठा सुरक्षित होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *