Headlines

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचंड हादरवणारी घोषणा, पुढच्या काही तासांत…होर्मुझमध्ये आता भयंकर घडणार?

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचंड हादरवणारी घोषणा, पुढच्या काही तासांत…होर्मुझमध्ये आता भयंकर घडणार?
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रचंड हादरवणारी घोषणा, पुढच्या काही तासांत…होर्मुझमध्ये आता भयंकर घडणार?


Strait Of Hormuz : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध अजूनही संपलेले नाही. या युद्धाला एक महिना संपलेल असून आता दुसरा महिनाही चालू झाला आहे. अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळेच इराणने तेलवाहू, व्यापारी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी अमेरिकेने याआधी केलेली आहे. तसेच ही मागणी लवकर मान्य न केल्यास त्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लगातील, असा इशाराही अमेरिकेने दिलेला आहे. इराण मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. असे असतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगात खळबळ उडवून देणारे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता होर्मुझच्या सामुद्रधुनीतच घणघोर युद्ध होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल ट्रुथ या सोशल मीडियावर होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत आपली भूमिका स्पष्ट केल आहे. काही वेळानंतर आपण होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुन्हा एकदा जलवाहतूक सुरू करू शकतो. या सामुद्रधुनीतून आपण तेल वाहून नेऊ शकतो आणि चांगली कमाई करू शकतो, अशा आशयाचे विधान ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांच्या या विधानाचे आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

20 टक्के तेलाचू वाहतूक होर्मुझमधून

एकीकडे डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध लवकरच संपणार असल्याचेही सांगत आहेत. त्यामुळे युद्ध समाप्तीचा मुद्दा लक्षात घेऊन तर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केलेले नसेल ना? असाही सवाल उपस्थित केला जातोय. एकूण तेलवाहतुकीपैकी साधारण 20 टक्के तेलाची वाहतूक ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केली जाते. त्यामुळेच ट्रम्प यांनी आता लवकरच ही सामुद्रधुनी जलवाहतुकीसाठी मोकळी होईल, असं म्हटलं आहे.

तर मोठा संघर्ष अटळ?

दरम्यान, आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच मोकळी करू, असं ट्रम्प म्हणाले असले तरी त्यांच्या या विधानामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याचा, बळाचा वापर करून ही सामुद्रधुनी इराणी सैनिकांपासून मोकळी करण्याचा प्रयत्न केला तर या संघर्षामुळे तेलाची किंमत गगनाला भिडू शकते, असेही मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *