Headlines

लाऊड स्पिकरवरुन यायचे भूतांचे आवाज, अखेर प्रकरण कोर्टात पोहचले, काय आहे नेमके प्रकरण ?

लाऊड स्पिकरवरुन यायचे भूतांचे आवाज, अखेर प्रकरण कोर्टात पोहचले, काय आहे नेमके प्रकरण ?
लाऊड स्पिकरवरुन यायचे भूतांचे आवाज, अखेर प्रकरण कोर्टात पोहचले, काय आहे नेमके प्रकरण ?


शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये होणाऱ्या भांडणाना कोणतेही कारण पुरेसे असते. कधी कचऱ्यावरुन तर कधी चपलांवरुन भांडणे होत असतात. एका शेजाऱ्यामध्ये अशाच कोणत्या तरी कारणापायी भांडण झाले. या भांडणाचा बदला घेण्यासाठी या व्यक्तीने केलेल्या उपायाने संपूर्ण परिसरातील लोकांची झोप उडाली. अखेर हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचले.नंतर अशा प्रकरणात जे व्हायचे ते झालेच. ज्याने ही विचित्र आयडीया काढली त्यालाच त्याचा फटाका बसला आहे.

शेजाऱ्यामध्ये भांडणे ही होतच असतात. मात्र काहीवेळा भांडणे विचित्र आणि भीतीदायक वळणे घेतात. चीनच्या ग्वांगझोऊ शहरातील एक विचित्र प्रकरण याचे ताजे उदाहरण आहे. येथे भांडणाचा बदला घेण्यासाठी वापरलेली पद्धत सर्वांनाच डोकेदुखी ठरली होती.

वास्तविक लू आणि त्याचा रुममेट ली यांचे शेजाऱ्यांशी भांडण झाले. रागात येऊन दोघांनी बदला घेण्याचा अनोखा प्लान रचला. साऊथ मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार त्यांनी घराच्या भिंजीजवळ लाऊड स्पीकर लावला. आणि त्यात रोज तासनतास भूतांची घाबरवणाऱ्या गोष्टी, आवाज, विचित्र आवाज काढू लागला.

हा प्रकार सकाळी ८.४५ वाजता सुरु होऊन दुपारी १२ वाजेपर्यंत चालायचा. नंतर थोडा ब्रेक घेतल्यानंतर सायंकाळी ३.३० वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पुन्हा सुरु व्हायचा. एकून १० तास भितीदायक वातावरण बनले होते.

सर्वात आश्चर्यकारक गोष्ट की हे आवाज कायद्याचे बंधन असलेल्या ६० डेसिबलहून थोडे कमी होते. म्हणजे प्रशासनाने कोणती कारवाई करु नये. परंतू याचा परिणाम त्याच्या टार्गेट शेजाऱ्यावर न पडता सर्वांनाच त्रास होऊ लागला.

अभ्यासावर झाला परिणाम, परिसरातले लोक वैतागले

शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीचा मुलगा परिक्षेची तयारी करत होता. सातत्याने येणाऱ्या भितीदायक आवाजाने त्याचे लक्ष लागेना. अभ्यासावर परिणाम होऊ लागला. हळूहळू सर्वांनाच त्रास होऊ लागला. शेवटी एका शेजाऱ्या कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला.

कोर्टाने दिला कठोर निर्णय

कोर्टाने या संपूर्ण प्रकरणाला जाणूनबुजून केलेला छळ असे म्हटले. निर्णय तक्रारदाराच्या बाजूने लागला. आणि लूला लागलीच लाऊड स्पीकर हटवण्याचे आदेश देण्यात आले. सर्व रेकॉर्डिंग डिलीट करावी लागली. लिखित माफी मागण्यासह पुन्हा असे करणार नाही असे हमीपत्र लिहून द्यावे लागले. या प्रकरणाला चीनचे कायदा मंत्र्याने सार्वजनिक केले. ज्यानंतर ते सोशल मीडियावर व्हायरल वेगाने झाले.

लोक या विचित्र बदल्याच्या निर्णयावर निरनिराळे कमेंट्स करत आहेत. कोणी यास क्रिएटीव्ह म्हणत आहे. तर कोणी कोर्टाने योग्य निर्णय घेतला असे म्हटले आहे. शेजाऱ्यामध्ये थोडी भांडणे होणे सहाजिकच आहे. म्हणून कोणी असा बदला घेत नाही. कारण हा आवाज त्याच्याही घरात घुमत होता. म्हणून एकाचा बदला इतरांसाठी त्रासदायक बनल्याने त्याचा परिणामही त्याच्यावरच झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *