
UPI Payment 1 Hour Break: देशातील ऑनलाईन फ्रॉड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही मोठी पावलं टाकली आहेत. केंद्रीय बँकेने 5 सुरक्षित बिंदूवर काम सुरू केले आहे. अर्थात हा केवळ एक प्रस्ताव आहे. या नवीन नियमामुळे पेमेंटसाठी आता वेळ लागणार आहे. पेमेंट प्राप्त होण्यासाठी समोरील व्यक्तीला 1 तास लागणार आहे. सुरक्षेसाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक जण हा नियम चांगला असल्याचे म्हणत आहेत. तर काहींनी या बदलावर नाक मुरडलं आहे.
नियमाची गरज का?
या नियमाची गरज का पडली हे अगोदर समजून घ्या. नॅशनल सायबर क्राइमच्या अहवालानुसार, वर्ष 2025 मध्ये 28 लाख डिजिटल फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले. सामान्य नागरिकांच्या खात्यातून जवळपास 22,931 रुपयांची चोरी झाली. या चोरीतील रक्कमेने बँकेचे लक्ष वेधले आहे. 10 हजार रुपयांवरील रक्कमेवर चोरट्यांनी हा डाका टाकला आहे. त्यामुळे एकीकडे डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देताना सुरक्षिततेविषयीही केंद्रीय बँक सतर्क झाली आहे.
काय आहे तो मास्टर प्लॅन?
आता नवीन फीचर्सनुसार, जर युझरला वाटले की त्याची फसवणूक झाली असे वाटत असेल तर एका सिंगल क्लिकवर तो डिजिटल पेमेंट् मोड्स तात्काळ बंद करू शकतो. त्यासाठी त्याला एक तासाचा वेळ लागू शकतो. एकाच क्लिकवर UPI, Net Banking आणि कार्डसची सुरक्षितता करता येईल.
10 हजार रुपयांच्या वरील रक्कमेच्या पेमेंटसाठी आता एक तास लागू शकतो. समजा जर 12 हजार रुपयांचे पेमेंट केले तर रक्कम खात्यातून वळती होईल. पण ती समोरच्या बँक खात्यात लागलीच जमा होणार नाही. त्यासाठी एक तास लागले. जर या दरम्यान हे खाते बोगस असेल अथवा सायबर भामट्यांचा हा खेळ असेल तर ते लक्षात येईल आणि कष्टाचा पैसा वाचेल.
सायबर भामट्यांची खाती हुडकण्यासाठी आरबीआयने मोठी मोहीम हाती घेतली आहे. जर एखाद्याचा खात्यात एकदम जास्त रक्कम यायला लागली तर त्या खात्यावर करडी नजर ठेवण्यात येईल. तसेच खातेदाराची चौकशी करण्यात येईल. जर खातेदाराचे ईकेवायसी जुळले नाही तर अशी खाती बंद होतील आणि संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई होईल.