Headlines

MI vs RCB Live Streaming : रोहित-विराटच्या सामन्याच्या वेळेत बदल? मुंबई-आरसीबी मॅच किती वाजता?

MI vs RCB Live Streaming : रोहित-विराटच्या सामन्याच्या वेळेत बदल? मुंबई-आरसीबी मॅच किती वाजता?
MI vs RCB Live Streaming : रोहित-विराटच्या सामन्याच्या वेळेत बदल? मुंबई-आरसीबी मॅच किती वाजता?


आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026)  क्रिकेट चाहत्यांना रविवारी 12 एप्रिलला डबर हेडरचा थरार पाहायला मिळणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. मात्र क्रिकेट चाहत्यांना या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा लागून आहे. दुसरा सामना हा हायव्होल्टेज असणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध भिडणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोसमातील चौथा सामना असणार आहे. दोन्ही संघांचा शेवटच्या सामन्यात पराभव झालाय. त्यामुळे दोन्ही संघांचा कमबॅक करुन विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कधी?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना रविवारी 12 एप्रिलला होणार आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना कुठे?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना पलटणचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल-लॅपटॉपवर मॅच पाहायला मिळेल. तसेच tv9marathi.com या वेबसाईटवर सामन्यातील प्रत्येक अपडेट आणि लाईव्ह स्कोअर जाणून घेता येईल.

स्कोअरकार्ड

मुंबई-बंगळुरुपैकी भारी कोण?

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रविवारी होणारा 35 वा टी 20 सामना असणार आहे. याआधी झालेल्या 34 पैकी सर्वाधिक सामन्यांत मुंबई वरचढ ठरली आहे. मुंबईने आरसीबी विरुद्ध 19 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीने 15 वेळा विजय मिळवला आहे.

रोहित-विराटच्या कामगिरीकडे लक्ष

दरम्यान मुंबई-आरसीबी सामन्यानिमित्ताने रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियाची अनुभवी जोडी एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. दोघांनीही या मोसमात लौकीकाला साजेशी सुरुवात केलीय. अशात आता ही स्टार जोडी कशी कामगिरी करते हे पाहणं चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *