Headlines

तो पर्यंत युद्धातून माघार नाहीच.. इराणने अमेरिकेला ललकारले, जग तणावात, थेट..

तो पर्यंत युद्धातून माघार नाहीच.. इराणने अमेरिकेला ललकारले, जग तणावात, थेट..
तो पर्यंत युद्धातून माघार नाहीच.. इराणने अमेरिकेला ललकारले, जग तणावात, थेट..


28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. या हल्ल्यानंतर खळबळ उडाली. इराणकडून ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्करतळ आहेत, अशा ठिकाणी हल्ला करण्यात आला. युद्ध एक महिना चालण्याचा अंदाज डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. मात्र, त्यापेक्षा अधिक युद्ध चालताना दिसले. या युद्धातमुळे जगात तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. जागतिक संकट उभे आहे. होर्मुज खाडीत तणाव आहे. काही देश युद्धबंदी करार करण्यासाठी पुढे आले. पाकिस्तानमध्ये युद्धबंदी कराराबद्दल पहिली बैठक झाली. कित्येक तास ही बैठक सुरू होती. मात्र, तोडगा निघू शकला नाही. पुन्हा सोमवारी बैठक आहे. पण त्यापूर्वीच इराणकडून जगात खळबळ उडवणारे विधान करण्यात आले. इराणकडून स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, जोपर्यंत आमच्या अटी मान्य होत नाहीत, तोवर आम्ही युद्धातून माघार घेणार नाहीत.

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, इराणने काही गोष्टी मान्य केल्या आहेत. युद्धबंदी कराराच्या आम्ही अगदी जवळ पोहोचलो आहोत. पण इराणने म्हटले की, युद्धात आमचा विजय झाला. आम्ही युद्धात माघार घेणार नाहीत, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत. यासोबतच सध्या होर्मुज खाडीत असलेल्या स्थितीवरही इराणकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली.

इराणने सांगितले की, आमच्या परवानगीशिवाय कोणीही होर्मुज खाडी पार करू शकणार नाही. हेच नाही तर जे कोणीही आम्हाला चांगले शुल्क देईल, त्याला आम्ही होर्मुज खाडी पार करण्यासाठी प्राधान्य देऊ. इराणने आम्हीच युद्ध जिंकल्याचा दावा केल्याने अमेरिकेत खळबळ उडाली. स्थिती बिकड होत आहे.

इराणकडून होर्मुज खाडीत शुक्ल आकारले जात आहे. मात्र, याला अमेरिकेचा विरोध आहे. भारताचे कित्येक जहाज होर्मुज खाडीत अडकले आहेत. चीनसारख्या देशांनी या मुद्दयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. कालच भारतीय जहाजावर होर्मुज खाडीत गोळीबार करण्यात आला. अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीनंतरही इराण हार मानताना दिसत नाहीये. आता इराणला अमेरिका काय प्रतिउत्तर देते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *