Headlines

शपथविधीपूर्वीच थलपती विजय बनला मुख्यमंत्री…. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा विजय असो… च्या घोषणांनी थिएटर दणाणले; व्हायरल व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ

शपथविधीपूर्वीच थलपती विजय बनला मुख्यमंत्री…. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा विजय असो… च्या घोषणांनी थिएटर दणाणले; व्हायरल व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ
शपथविधीपूर्वीच थलपती विजय बनला मुख्यमंत्री…. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा विजय असो… च्या घोषणांनी थिएटर दणाणले; व्हायरल व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ


Thalapathy Vijay Viral Video : तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असताना अभिनेता ते राजकारणी बनलेला थलपती विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या TVK पक्षाने विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत 108 जागांवर विजय मिळवला. मात्र सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत अद्याप मिळालेले नसल्याने राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे.

याच दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यातून मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये विजयला “Honorable Chief Minister C. Joseph Vijay” असे संबोधण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ सिनेमागृहात दाखवण्यात आल्याने आता कायदेशीर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

थिएटरमध्ये ‘CM विजय’चा जल्लोष

7 मे रोजी काही सिनेमागृहांमधून समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये विजयचे चाहते थिएटरमध्ये जल्लोष करताना दिसले. व्हिडीओ सुरू होताच विजयला तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून दाखवण्यात आले. त्यानंतर त्याचा दमदार पोलिस लूक दाखवण्यात आला आणि शेवटी त्याच्या आगामी जना नायगन चित्रपटाची झलक दाखवण्यात आली.

व्हिडीओमध्ये लेट्स सेलिब्रेट इन थिएटर्स सून असा संदेशही दाखवण्यात आला होता. याशिवाय शेवटी KG Cinemas कडून धन्यवाद संदेश दाखवण्यात आला. व्हिडीओ पाहताच चाहत्यांनी थिएटरमध्ये टाळ्या, शिट्ट्या आणि घोषणाबाजी करत जल्लोष केला. या दृश्यांचे अनेक क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.

सोशल मीडियावर रंगली चर्चा

हा व्हिडीओ Instagram, X आणि Reddit वर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. सुरुवातीला अनेकांनी हा फॅन-मेड किंवा AI च्या मदतीने तयार केलेला व्हिडीओ असल्याचा दावा केला.

मात्र KG Cinemas शी संबंधित एका सूत्राने सांगितले की, हा व्हिडीओ चाहत्यांनी तयार केलेला नव्हता. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे चार मिनिटांचा खास मिक्स व्हिडीओ ‘जना नायगन’च्या टीमकडून पाठवण्यात आला होता. त्यामध्ये विजयचे गाणे आणि विविध सीनचा समावेश होता. सूत्रांनी असेही स्पष्ट केले की, हा व्हिडीओ थेट चित्रपट निर्मिती कंपनीकडून आलेला नव्हता. थिएटरकडून त्यामध्ये ‘जना नायगन’शी संबंधित काही भाग जोडण्यात आले होते.

‘CM विजय’ पोस्टमुळे वाढला वाद

या व्हिडीओचा दुवा नंतर Ahimsa Entertainment Instagram Page वरही दिसून आला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये विजय आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्याचे म्हटले गेले होते. तसेच ‘जना नायगन’ चित्रपट थिएटरमध्ये मोठा धमाका करेल असेही नमूद करण्यात आले होते.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *