Headlines

जगाला ज्याची प्रतिक्षा तेच घडले, युद्धदरम्यानच थेट युद्धविरामाचे संकेत, बैठकीसाठी..

जगाला ज्याची प्रतिक्षा तेच घडले, युद्धदरम्यानच थेट युद्धविरामाचे संकेत, बैठकीसाठी..
जगाला ज्याची प्रतिक्षा तेच घडले, युद्धदरम्यानच थेट युद्धविरामाचे संकेत, बैठकीसाठी..


गेल्या काही दिवसांपासून युद्धामुळे जग वैतागले आहे. इराण आणि रशिया यांच्यातील युद्धाचा मोठा फटका भारतासह अन्य देशांना बसत आहे. ऊर्जेचे संकट आहे. जागतिक बाजार अस्थिर झाला. गेल्या काही वर्षांपासून युद्धाचा मोठा फटका जगाला बसत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला करून एका नव्या युद्धाला सुरूवात केली. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबले पाहिजे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, संघर्ष कमी होण्यापेक्षा अधिक वाढत आहे. युक्रेन आणि रशिया युद्धात अमेरिका मध्यस्थी करत होती. दुसरीकडे इराण आणि अमेरिका युद्धात रशियाने मध्यस्थी करू शकत असल्याची आपली भूमिका जाहीर केली. यादरम्यानच जगाला ज्याची प्रतिक्षा होती, ती घोषणा आता अगदी लवकरच होऊ शकते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या एका वक्तव्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींना वेग आला.

मॉस्कोमधील विजय दिवस संचलनानंतर बोलताना पुतिन यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धविरामाबद्दल मोठे संकेत दिले आहेत. यासोबतच त्यांनी युक्रेनसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचेही म्हटले. गेल्या चार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. आता कुठेतरी युद्धविराम होण्याचे संकेत मिळाली आहेत. पुतिन यांनी म्हटले की, मला वाटते की, युद्धबंदीच्या दिशेने पाऊले उचलली जात आहेत.

अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेला तीन दिवसांचा शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. पुतिन यांनी पुढे म्हटले की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना ते भेटण्यासाठी तयार आहेत. पण त्यांची एक अट असणार आहे. शांतता कराराच्या सर्व प्रमुख मुद्द्यांवर एकमत झाल्यानंतरच ही बैठक होईल. याचा अर्थ असा की, ही बैठक अंतिम टप्पा असेल, जिथे कराराला थेटपणे केले जातील.

रशिया आणि युक्रेन युद्धाला अमेरिकेने खतपाणी घातल्याचा आरोप होतो. यासोबतच या युद्धात अमेरिकेने रशियाच्या तेलावर निर्बंध घातले. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावण्यात आला. आता रशिया या युद्धादरम्यान बैठकीस तयार आहे. तसे विधान पुतिन यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *