Headlines

DDLJ मधील हा आयकॉनिक सीन कुठे शूट झालाय? आता कसं दिसतं ठिकाणं? अनुपम खेर यांनी शेअर केला भावूक व्हिडीओ

DDLJ मधील हा आयकॉनिक सीन कुठे शूट झालाय? आता कसं दिसतं ठिकाणं? अनुपम खेर यांनी शेअर केला भावूक व्हिडीओ
DDLJ मधील हा आयकॉनिक सीन कुठे शूट झालाय? आता कसं दिसतं ठिकाणं? अनुपम खेर यांनी शेअर केला भावूक व्हिडीओ


बॉलिवूडमधील सर्वात आयकॉनिक चित्रपटांपैकी एक मानला जाणारा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ आजही प्रेक्षकांच्या मनात तितकाच जिवंत आहे. विशेषतः ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी…’ हा संवाद आणि त्यानंतरचा ट्रेनचा सीन भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात लक्षात राहणाऱ्या क्षणांपैकी एक मानला जातो. आता या सीनशी संबंधित एक खास व्हिडीओ अभिनेते अनुपम खैर यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून तो मोठ्या चर्चेत आला आहे.

अनुपम खेर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. चित्रपट, शूटिंग, सामाजिक विषय आणि वैयक्तिक अनुभव याबाबत ते नियमित पोस्ट करत असतात. यावेळी त्यांनी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधील प्रसिद्ध ट्रेन सीन शूट झालेल्या लोकेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा तोच सीन आहे ज्यामध्ये अमरिश पुरी सिमरनचा हात सोडत ‘जा सिमरन जा…’ म्हणतात आणि त्यानंतर काजल धावत जाऊन शाहरुख खानचा हात पकडते.

32 वर्षानंतर शाहरुख-काजलचा तो सीन चर्चेत

या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता तब्बल 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा वेळी अनुपम खेर यांनी त्या जुन्या आठवणींना उजाळा देत शूटिंग लोकेशनची सध्याची अवस्था चाहत्यांना दाखवली आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील आपटा रेल्वे स्थानक हे स्टेशन दिसत आहे, जिथे हा प्रसिद्ध सीन चित्रित करण्यात आला होता.

व्हिडीओ शेअर करताना अनुपम खेर यांनी भावूक कॅप्शनही लिहिलं. त्यांनी म्हटलं, ’32 वर्षांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी शूटिंग करणं खूप भावनिक आणि जुन्या आठवणींनी भरलेला अनुभव होता. आम्ही जेव्हा हा सीन शूट करत होतो, तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की शाहरुख खान आणि काजोल यांचा तो क्षण भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात आयकॉनिक दृश्यांपैकी एक बनेल. पण आयुष्याची खरी सुंदरता कदाचित यातच आहे की, एखाद्या क्षणाचं महानत्व आपल्याला खूप उशिरा जाणवतं.’

अनुपम खेर यांची सरकारला विनंती

अनुपम खेर यांनी पुढे महाराष्ट्र सरकारलाही एक खास विनंती केली. त्यांनी म्हटलं की, आपटा रेल्वे स्थानक या ठिकाणाला पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात यावं. जगभरात अनेक चित्रपटांच्या लोकेशन्सना ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व दिलं जातं. भारतातही सिनेमाशी जोडलेल्या अशा ठिकाणांना जपलं गेलं पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं.

‘जादू फक्त चित्रपटांमध्ये नसते, काही ठिकाणांमध्येही ती कायम असते,’ असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. यासोबतच त्यांनी दिवंगत दिग्दर्शक Yash Chopra यांच्या साधेपणा, उबदार स्वभाव आणि उदारतेची आठवणही काढली.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *