Headlines

मोठा विध्वंस! थेट अणुऊर्जा प्रकल्पाला उडवलं, भीषण हल्ल्याने जगात खळबळ, आगीच्या ज्वाळा थेट…

मोठा विध्वंस! थेट अणुऊर्जा प्रकल्पाला उडवलं, भीषण हल्ल्याने जगात खळबळ, आगीच्या ज्वाळा थेट…
मोठा विध्वंस! थेट अणुऊर्जा प्रकल्पाला उडवलं, भीषण हल्ल्याने जगात खळबळ, आगीच्या ज्वाळा थेट…


गेल्या काही काळापासून मध्य पूर्वेतील देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात मध्य पूर्वेतील ज्या देशांमध्ये अमेरिकन तळ आहेत त्या ठिकाणी हल्ले झाले होते. अशातच आता अबू धाबीतील बराकाह अणुऊर्जा प्रकल्पाबाहेर मोठा ड्रोन हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेवर किंवा कार्यप्रणालीवर कोणताही परिणाम झालेला नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बराकाह अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला

बराकाह अणुऊर्जा प्रकल्प हा संयुक्त अरब अमिरातीतील एकमेव अणुऊर्जा प्रकल्प असून तो सौदी अरेबियाच्या सीमेजवळ देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित आहे. तेलावरची अवलंबित्व कमी करून ऊर्जा क्षेत्रात विविधता आणण्याच्या UAE च्या धोरणातील हा एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ड्रोन हल्ल्यानंतर प्रकल्पाच्या बाहेरील भागात आग लागली. UAE प्रशासनाने सांगितले की या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि अणुऊर्जा सुरक्षेवर कोणताही परिणाम झाला नाही.

यापूर्वी अलीकडेच UAE मधील फुजैराह येथील तेल प्रकल्पावर इराणी ड्रोन हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात तीन भारतीय नागरिक जखमी झाले होते. त्या वेळी UAE सैन्याने अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली होती. त्यामुळे अमिरातीतील महत्त्वाच्या ठिकाणांवर होणाऱ्या हल्ल्यांची तीव्रता आणि धोका वाढल्याचे मानले जात आहे. यापूर्वीही येमेनमधील हूथी बंडखोरांनी बराकाह अणुऊर्जा प्रकल्पावर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा केला होता. मात्र UAE प्रशासनाने हे दावे फेटाळून लावत, क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीमुळे सर्व हल्ले निष्फळ ठरल्याचे सांगितले होते.

वाढता प्रादेशिक तणाव

फुजैराह तेल प्रकल्पावरील हल्ल्यानंतर इराण UAE च्या आतील भागांपर्यंत पोहोचू शकते, हे स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, UAE च्या बराकाह अणुऊर्जा प्रकल्पावर किंवा इराणच्या बुशेहर अणुऊर्जा प्रकल्पावर थेट हल्ला झाल्यास संपूर्ण मध्यपूर्वेत भीषण परिणाम होऊ शकतात. बराकाह प्रकल्पात दक्षिण कोरियाने विकसित केलेल्या APR-1400 प्रकारच्या चार अणुभट्ट्या आहेत. UAE सरकारने या ताज्या घटनेमागे कोणत्या गटाचा किंवा देशाचा हात आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *