Headlines

Baba Vanga: पेट्रोल-डिझेलसह LPG चे संकट येणार… बाबा वेंगाने अगोदरच केले होते भाकीत? Viral दाव्यातील सत्य काय?

Baba Vanga: पेट्रोल-डिझेलसह LPG चे संकट येणार… बाबा वेंगाने अगोदरच केले होते भाकीत? Viral दाव्यातील सत्य काय?
Baba Vanga: पेट्रोल-डिझेलसह LPG चे संकट येणार… बाबा वेंगाने अगोदरच केले होते भाकीत? Viral दाव्यातील सत्य काय?


बाबा वेंगा भविष्यवाणीImage Credit source: एजन्सी

Baba Vanga Prediction on Petrol Diesel LPG Crisis: सध्य जगावर ऊर्जा संकट कोसळले आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची टंचाई, महागाईने अनेक देशातील नागरीक हैराण आहेत. त्याचवेळी इंटरनेटवर बाबा वेंगाची याविषयीची भविष्यवाणी व्हायरल झाली आहे. या भविष्यवाणीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकणार, एलपीजी महाग होणार असे भाकीत केल्याचा दावा करण्यात येत आहे. जगावर 2026 मध्ये अनेक संकट येणार असे भाकीत तिने केल्याचा दावा करण्यात आला आहे.

काय आहे दावा?

इंटरनेटवर एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. त्यानुसार बाबा वेंगाने यावर्षाच्या सुरुवातीलाच मध्य-पूर्वेतील युद्ध, आर्थिक मंदी आणि जागतिक ऊर्जा संकटाची भविष्यवाणी केली होती. त्यानुसार जगभरात पेट्रोल आणि डिझेलेचा पुरवठा खंडीत होईल. अनियमित होईल आणि इंधनाच्या किंमती वाढतील असा दावा करण्यात आला. तर सीएनजी आणि एलपीजी किंमती सर्वसामान्यांना हैराण करतील असे भाकीत बाबा वेंगानं केल्याचा दावा करण्यात आला आहे. अर्थात या दाव्याची कोणीही पुष्टी केली नाही.

जेव्हा पण जगावर संकट आले. एखादे युद्ध सुरू झाले की असे दावे व्हायरल होतात. त्यात बाबा वेंगा अथवा नास्त्रेदामस अथवा इतर कुणाच्या नावे असे दावे व्हायरल करण्यात येतात. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासूनच जगात अनेक वस्तूंचे भाव वाढले. त्यात इस्त्रायल-इराण, इराण-अमेरिका आणि आखाती देश यामधील युद्धामुळे आणि होर्मुझ समुद्रधुनीतील वाहतूक बंद झाल्याने मोठे संकट उद्भवले आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडला आहे. अनेक कंपन्या, कारखान्यांना अघोषित ताळेबंदी लागू झाली आहे. अनेक हॉटेल्स, धाबे आणि चहा टपऱ्या बंद झाल्या आहेत. हे संकट अजून गडद होण्याची शक्यता आहे. अनेक शहरात डिझेलसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सर्वदूर चिंतेचे वातावरण आहे.

जोपर्यंत इराण-अमेरिका संघर्ष थांबत नाही. भारत-अमेरिकेतली व्यापार करार पुढे जात नाही. तोपर्यंत ऊर्जा संकट कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठा साखळीवरील आघात सुरुच आहे. जोपर्यंत पुरवठा साखळी सुरळीत होत नाही तोपर्यंत जगातील बड्या महाशक्ती सोडल्या तर सर्वच देशावर ऊर्जा संकट कायम असेल. अनेक देश त्यासाठी पर्यायी इंधनाकडे आणि पर्यायाकडे वळले आहेत. तोच एकमेव मोठा तोडगा सध्याच्या संकटावर असल्याचे मानले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *