Headlines

आदर्शच्या प्रेमात मुली व्हायच्या बेभान, तब्बल 100 तरुणींसोबत नको ते घडलं; लव्ह स्कॅममुळे महाराष्ट्र हादरला!

आदर्शच्या प्रेमात मुली व्हायच्या बेभान, तब्बल 100 तरुणींसोबत नको ते घडलं; लव्ह स्कॅममुळे महाराष्ट्र हादरला!
आदर्शच्या प्रेमात मुली व्हायच्या बेभान, तब्बल 100 तरुणींसोबत नको ते घडलं; लव्ह स्कॅममुळे महाराष्ट्र हादरला!


सोशल मीडियावर ओळख… प्रेमाच्या गप्पा… विश्वास संपादन… आणि मग लाखोंची फसवणूक… डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अशाच एका हायप्रोफाईल ‘लव्ह स्कॅमर’ला ताब्यात घेतलं आहे. आदर्श म्हात्रे असं या आरोपीचं नाव असून, त्याने तब्बल 100 हून अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्चशिक्षित आणि मोठ्या पदांवर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरी कडे आरोपीवर मुंबई, नवीमुंबई, ठाणे सह इतर ठिकाणी 11 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून पोलीस चौकशीत आरोपीच्या बँक खात्यात तब्बल 9 कोटी रुपये आढळल्याने या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

विविध बँकांमधून लाखो रुपयांची कर्जे

पनवेलमधील तुराडे गावचा रहिवासी असलेला आदर्श म्हात्रे हा सोशल मीडिया आणि मॅट्रिमोनियल साइटच्या माध्यमातून तरुणींशी संपर्क साधत असे. सुरुवातीला गोड बोलून मैत्री करायची, त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण करून संबंधित तरुणींचा पूर्ण विश्वास संपादन करायचा आणि मग त्यांच्या नावावर विविध बँकांमधून लाखो रुपयांची कर्जे काढून आर्थिक फसवणूक करायचा, असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे.

फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला या उच्चशिक्षित

पोलिस चौकशीत आतापर्यंत त्यांनी तब्बल 100 हून अधिक तरुणींना त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापैकी 11 महिलांनी पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली असून आणखी काही पीडित महिला पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला या उच्चशिक्षित असून कॉर्पोरेट, आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत असल्याचं तपासात उघड झालं आहे.

आरोपी महिलांना लग्नाचे आमिष दाखवत असे. काही महिलांसोबत त्याने शारीरिक संबंधही प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर विविध कारणं सांगून त्यांच्या नावावर कर्ज काढून पैसे उकळले जात होते. देशातीलच नव्हे तर परदेशातील महिलांनाही त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर येत आहे. आदर्श म्हात्रे हा आलिशान जीवनशैली जगत असून त्याच्याकडे मर्सिडीजसारखी महागडी गाडी आहे. तो नेहमी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत असल्याचंही तपासात निष्पन्न झालं आहे.

या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी आधी कारवाई केली होती. त्यानंतर डोंबिवलीतील एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी आदर्श म्हात्रेला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याचं बँक अकाउंट सीज केलं असून त्या खात्यात तब्बल 9 कोटी रुपये असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या मानपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *