Headlines

संघाच्या आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या कार्यात अनेक समानता, कुमार मंगलम बिर्ला यांनी केले संघाचे तोंडभरून कौतुक

संघाच्या आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या कार्यात अनेक समानता, कुमार मंगलम बिर्ला यांनी केले संघाचे तोंडभरून कौतुक
संघाच्या आणि आदित्य बिर्ला ग्रुपच्या कार्यात अनेक समानता, कुमार मंगलम बिर्ला यांनी केले संघाचे तोंडभरून कौतुक


Kumar Mangalam Birla : देशातील प्रसिद्ध उद्योजक कुमार मंगलम बिरला यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तोंडभरून कौतुक केले. गुरुवारी (4 जून) नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित होते. आदित्य बिरला ग्रुप आणि संघाच्या कार्यात अनेक समानता आहेत, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. संघाने स्थापनेची 100 वर्षे पूर्ण केली हा काळ काही थोडा नाही. संघ समाजकार्यासाठी कायम उभा राहिलेला आहे, असेही यावेळी कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.

सरसंघचालकांचे विचार, त्यांचं ध्येय आणि त्यांचं काम बघून मी प्रभावित झालो आहे. संघाच्या आज एवढ्या मोठ्या प्रमाणात शाखा आहेत. स्वातंत्रपूर्व काळापासून आजपर्यंत अनेक संकटांच्या काळात संघ समाजकार्य करण्यासाठी उभा राहिलेला आहे. संघाने 100 वर्ष पूर्ण केलेले आहेत. हा काही थोडा काळ नाही, अशा शब्दांत त्यांनी संघाची स्तुती केली. तसेच, पंतप्रधान अमृतकालाबद्दल बोलत असतात. भारताचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. आता हा भारताचा काळ आहे. कच्चा तेलाच्या किमतीमध्ये अनेकदा चढ-उतार होत राहिला आहे, असेही यावेळी कुमार मंगलम बिरला म्हणाले.

एआय आता आमच्या दरवाजावर आहे. भारतासाठी हा आव्हानाचा काळ आहे. मात्र भारत आता अमृतकाळात आहे. भारतात विकास होत आहे. आमच्या एका कंपनीची सुरवात स्वातंत्र्याच्या कळात झाली. माझे पणजोब त्या काळात कॉटन व्यवसाय करत होते. मात्र त्यात त्यांना विकास करायचा होता. त्यात त्यांनी बदल केला आणि व्यवसाय वाढविला. आदित्य बिरला ग्रुप आणि संघाच्या कार्यात अनेक समानता आहेत. शिक्षण, समाजसेवा यात आम्ही मोठ्या प्रमाणात काम करून योगदान देत असतो, असे कुमार मंगलम बिर्ला म्हणाले.

आमच्या शाळा आणि कॉलेजमध्ये व्यक्तित्व विकासाला महत्त्व दिले जाते. उद्योगाने देशाचा विकास होत असतो. नेशन बिल्डिंग हा आमच्या परिवारातील महत्वाचा विषय आहे आणि आम्ही त्यावर काम करतो. मजबूत उद्योगाच्या सुरवातीने राष्ट्र सावरत असत त्यातून विकास होत आहे. पाण्यानंतर सगळ्यात जास्त सिमेंट लागते. समाजाला जोडणारे रस्ते, शाळा, घर सगळं सिमेंटने बनत असते. मेट्रो, रेलमध्ये काम मोठ्या प्रमाणात होत आहे. आमच्या सिमेंट कंपनीची क्षमता खूप वाढली आहे. ही कंपनी जगातील सगळ्यात मोठी सिमेंट कंपनी आहे, असे कुमार मंगलम बिर्ला यांनी आवर्जुन सांगितले.

आमच्या फायनान्स कंपनीची कर्ज देण्याची क्षमता 2 हजार कोटी रुपयांर्यंत पोहचली. आमची कंपनी सामान्यांना कर्ज देते. विकसित भारताच स्वप्न मोठं आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या कंपन्या आवश्यक आहेत. युवकांनो भारतात काम करा, भारतासाठी काम करा, भारतात राहून काम करा, असे आवाहनही त्यांनी केले. हे युग भारताचे आहे. या आधी असा वेळ नव्हता. आता ती वेळ आली आहे. युवकांनो रोजगार निर्माण करा, स्टार्टअप सुरू करा, असेही आवाहन कुमार मंगलम बिर्ला यांनी केले. मी आज दिवस भर संघ कसं काम करतो ते बघितलं संघाचा काम देशाला पुढे नेण्यासाठी सुरु आहे, असेही शेवटी त्यांनी आवर्जून सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *