Headlines

लाडक्या बहिणांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, अखेर तारीख समोर आली; वाचा खुशखबर!

लाडक्या बहिणांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, अखेर तारीख समोर आली; वाचा खुशखबर!
लाडक्या बहिणांना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, अखेर तारीख समोर आली; वाचा खुशखबर!


Ladki Bahin Yojana Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये या योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या प्रक्रियेनंतर साधारण 80 लाख लाडक्या बहिणींचे नाव लाभार्थी महिलांच्या यादीतून हटवण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 80 लाख महिलांना एका प्रकारे या योजनेचा लाभ मिळणेच बंद झाले आहे. नुकतेच सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पाठवले होते. दरम्यान, आता लाडकी योजनेचे मे महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार? असे विचारले जात आहे. याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हे पैसे नेमके कधी मिळणार, हे समोर आले आहे.

मे महिन्याचे पैसे नेमके कधी मिळणार?

लाडक्या बहिणींना नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्याचे एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. मे महिन्याच्या 15 तारखेनंतर हे पैसे महिलांच्या बँक खात्यात यायला सुरुवात झाली होती. आता जून महिन्याचे सहा दिवस होऊन गेले तरीही अद्याप मे महिन्याचे 1500 रुपये पात्र महिलांना मिळालेले नाहीत. दरम्यान, आता याच मे महिन्याच्या लाभाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला व बालविकास विभाातील सूत्रांनुसार मे महिन्याचा लाभ मिळण्यास लवकरच सुरूवात हऊ शकते. जून महिन्याच्या 12 ते 15 या तारखेदरम्यान कधीही महिलांच्या बँक खात्यावर 1500 रुपये जमा होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

आता किती महिलांना मिळतोय लाभ?

दरम्यान, ई-केवायसी न केल्यामुळे, ई-केवायसीतून समोर आलेल्या माहितीमुळे, तसेच निकष पूर्ण न केल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींच नाव या योजनेच्या लाभार्थी यादीतून हटवण्यात आले आहे. एकूण 80 लाख महिलांना लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांची संख्या ही 1 कोटी 66 लाख एवढी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही पुन्हा एकदा ई-केवायसी सुरू करण्यास तयार आहोत, असे सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *