Headlines

अंगणात खेळणाऱ्या मुलाच्या शरीरात चार गोळ्या घुसल्या, धक्कादायक घटनेने संताप

अंगणात खेळणाऱ्या मुलाच्या शरीरात चार गोळ्या घुसल्या, धक्कादायक घटनेने संताप
अंगणात खेळणाऱ्या मुलाच्या शरीरात चार गोळ्या घुसल्या, धक्कादायक घटनेने संताप


कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरंग आदिवासी वाडीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घराच्या पाठीमागे खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाच्या शरीरात चार ठिकाणी गोळ्या किंवा छर्रे घुसल्याने तो गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. या मुलाला या गोळ्या कशा काय लागल्या याचे कोडे उलगडलेले नाही. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नेरळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कर्जत तालुक्यातील कुरंग आदिवासी वाडी येथे बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हेमंत रामदास सराई हा दहा वर्षांचा मुलगा घराच्या पाटी खेळत होता. त्यावेळी अचानक हेमंत याच्या शरीरात बंदुकीचे छर्रे घुसल्याने तो खाली कोसळला. त्याला प्रचंड वेदना होत असल्याने त्याने आरडा ओरडा करुन त्याच्या आईला हाक मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर घरातील मंडळी बाहेर आली तर त्यांना त्यांचा मुलगा वेदनेने विव्हळताना दिसला. या प्रकारामुळे त्याचे कुटुंबिय आणि ग्रामस्थ प्रचंड घाबरले आणि त्यांनी या मुलाला तातडीने उल्हासनगरातील रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर येथे तातडीने उपचार करण्यात आले. सध्या हेमंतची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

हेमंत रामदास सराई (वय १०) हा मुलगा आपल्या घराच्या मागील आवारात खेळत होता. अचानक त्याच्या शरीरावर गोळ्या किंवा छर्रे घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने हेमंतला उपचारासाठी उल्हासनगर येथील रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. हेमंत याला गोळ्या किंवा छर्रे नेमके लागले कसे याचे गौडबंगाल कायम आहेत.

भीतीचे वातावरण

प्राथमिक माहितीनुसार हा परिसर जंगल सदृश्य असल्याने शिकारीदरम्यान बंदुकीतून सुटलेले छर्रे किंवा गोळी या मुलाला लागल्याने तो जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.मात्र ही घटना नेमकी कशी घडली, गोळी कोणी झाडली आणि यामागे कोण जबाबदार आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा आणि प्राथमिक चौकशी सुरू केली असून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे.दरम्यान, आदिवासी वस्तीतील अल्पवयीन मुलाला अशा प्रकारे गोळ्या लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जंगल परिसरातील बेकायदेशीर शिकारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *