
होंडा ॲक्टिवा ( Honda Activa ) सध्या दुचाकीच्या बाजारात किंग आहे. मात्र आता होंडा कंपनी भारतात आणखी एक स्कूटर लाँच करण्याची तयारी करत आहे. होंडा भारतात एडीव्ही ( ADV ) 160 ला लाँच करत आहे. बातम्यानुसार कंपनी या प्रीमियम मॅक्सी स्कूटरच्या लोकलायझेशनवर काम करीत आहे. मात्र, अधिकृतपणे कंपनीने याची माहिती अद्याप दिलेली नाही.
असा अंदाज लावला जात आहे की Honda ADV 160 भारतीय बाजारात या वर्षाच्या अखेर किंवा वर्षाच्या सुरुवातीला लाँच करु शकते. एकीकडे ट्रॅडिशनल स्कूटर्सला शहराच्या दृष्टीने तयार केले जाते. तेथे होंडा कंपनी एडीव्ही १६० ला एडव्हेंचर स्कूटर म्हणून लाँच करणार आहे.
पॉवरफुल इंजिन आणि दमदार फिचर्स
या स्कूटरमध्ये लांब विंडस्क्रीन, अपराईट रायडिंग पोझिशन, लांब सिंगल सीट, मस्क्युलर बॉडीवर्क आणि एक स्वतंत्र स्टाईलच्या फ्रंट सेक्शनच्या सोबत येणार आहे. होंडाची ही स्कूटर ग्लोबल मार्केटमध्ये येत आहे. या स्कूटरचा ग्राऊंड क्लिअरन्स १६५ एमएमची आहे. यात १४ इंचाचा फ्रंट व्हील आणि १३ इंचाचा रिअर व्हील्स मिळणार आहे.ही स्कूटर ट्युबलेस टायर सोबत येते.
होंडाच्या या स्कूटरमध्ये लेटेस्ट १५६.९ सीसीचा लिक्विड कुल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन मिळते. ही मोटर १५.८ एचपीची पॉवर आणि १४.७ एनएमचा टार्क प्रोड्युस करतो. यात सीव्हीटी ऑटोमेटिक ट्रान्समिशन मिळणार आहे. एडीव्ही १६० मध्ये होंडाचा एसीजी स्टार्टर सिस्टीम मिळेल आणि यात आयडल स्टॉप टेक्नॉलॉजी मिळते.
कोणत्या स्कूटर्सशी होणार मुकाबला ?
डायमेन्शलची चर्चा करायची असेल तर या स्कूटरची लांबी १,९५० एमएम, रुंदी ७६३ एमएम आणि उंची ११९६ एमएमची आहे. स्कूटर १३२४ एमएमच्या व्हीलबेससोबत येतो. स्कूटरच्या सीट हाईट ७८० एमएमची आहे.आणि याचा कर्ब वेट १३३ किलोग्रॅम आहे. या स्कूटरमध्ये ८.१ लिटरचा फ्युअल टँक मिळतो. ही स्कूटर ४५ किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज देते.
होंडाच्या स्कूटरचा थेट मुकाबला हिरो झूम १६० ( Hero Xoom 160 ), टीव्हीएस एनटॉर्क 150 ( TVS Ntorq 150 ) आणि यामाहा एअरोक्स १५५ ( Yamaha Aerox 155 ) शी होईल. स्कूटरमध्ये फुल डिजिटल एलसीडी इंस्ट्रमेंट क्लस्टर, किलेस स्मार्टची सिस्टीम, युएसबी चार्जिंग सॉकेट, ॲडजस्टेबल विंडस्क्रीन आणि मोठी अंडर सीट स्टोरेज मिळणार आहे.