
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार फुटले आहेत. या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील, वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.
सध्या दिल्लीतील घडामोडींना वेग आला असताना उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. घराच्या आसपास पोलिसांचा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या फुटलेल्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलीस उपायुक्त अभयसिंग देशमुख यांनी संजय दिना पाटील यांच्या निवासांच्या बाहेर पाहणी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.