Headlines

इतका घमंडीपणा का? 5 वर्षांच्या मुलाने डिलिव्हरी बॉयला सुनावलं; दिया मिर्झावर भडकले नेटकरी

इतका घमंडीपणा का? 5 वर्षांच्या मुलाने डिलिव्हरी बॉयला सुनावलं; दिया मिर्झावर भडकले नेटकरी
इतका घमंडीपणा का? 5 वर्षांच्या मुलाने डिलिव्हरी बॉयला सुनावलं; दिया मिर्झावर भडकले नेटकरी


बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगचा सामना करत आहे. यामागचं कारण तिचा एखादा चित्रपट किंवा वक्तव्य नाही, तर तिचा 5 वर्षांचा मुलगा अव्यान आझाद रेखीशी संबंधित एक किस्सा आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दियाने सांगितलं की, एकदा तिच्या मुलाने एका डिलिव्हरी बॉयला प्लास्टिकच्या वापरावरून ज्ञान दिलं होतं. दिया मिर्झाने नुकतीच अभिनेत्री सोहा अली खानच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत जेव्हा तिला हवामान बदल आणि प्लास्टिकचा वापर याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने तिच्या मुलाचा हा किस्सा सांगितला.

दियाने सांगितलं की, एकदा तिच्या घरी नारळाचं पाणी घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयच्या हातात प्लास्टिकची पिशवी आणि प्लास्टिकचा स्ट्रॉ होता. हे पाहून तिच्या पाच वर्षांच्या मुलाने त्याला प्लास्टिकच्या वापराविरोधात बोलून दाखवलं. मी आणि माझ्या घरातले सर्वजण प्लास्टिकच्या वापराविरोधात असल्याचं ती म्हणते. याविषयी ती पॉडकास्टमध्ये सोहाला पुढे सांगते, “नारळ पाणीवाल्याने आम्हाला प्लास्टिकच्या पिशवीत नारळाचं पाणी दिलं आणि त्यासोबत स्ट्रॉसुद्धा प्लास्टिकचा दिला होता. प्लास्टिकच्या वापराने माझा खूप संताप होतो. आपण कोणाच्या घरी डिलिव्हरी देतोय, हे त्या डिलिव्हरी बॉयला कसं माहित असणार? तर माझा मुलगा अव्यानने दरवाजा उघडला आणि तो त्याच्या कमरेवर हात ठेवून म्हणाला, भैय्या प्लास्टिक घेऊन आले आहेत. आमच्या घरात प्लास्टिकच्या वापराला मनाई आहे. तुम्ही प्लास्टिकमधून ते पाणी काढा आणि त्या स्ट्रॉसह ती पिशवी घेऊन जा.”

पहा व्हिडीओ-

दियाने सांगितलेला हा किस्सा ऐकताच सोहा तिच्या मुलाचं कौतुक करते. “विचार करा, इतक्या कमी वयात एखाद्या मोठ्या व्यक्तीसमोर आत्मविश्वासाने आपलं मत मांडणं सोपं नसतं”, असं सोहा म्हणते. मात्र सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिया मिर्झाला यावरून खूप ट्रोल केलं आहे. पर्यावरणाबद्दल जागरूक राहणं चांगली गोष्ट आहे, पण कोणत्याही डिलिव्हरी बॉयशी अशा पद्धतीने बोलणं योग्य नसल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर मुलाला शिष्टाचारसुद्धा शिकवलं पाहिजे, अशा शब्दांत काहींनी टीका केली.

‘जर तुला प्लास्टिक नको असेल तर स्वत: बाहेर जाऊन गाडीवरून नारळपाणी खरेदी केलं पाहिजे. पेपर बॅगमध्ये नारळपाणी घरी आणलं पाहिजे. हीच लोकं नंतर कॅमेरासमोर फार सभ्य आणि खरं असण्याचा दिखावा करतात’, असं एकाने लिहिलं. तर ‘कोणत्या गोष्टीचा इतका घमंड आहे’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. तर ’40 डिग्रीच्या गरमीत जर एखादी व्यक्ती तुमची सेवा करत असेल तर त्याच्याशी असं बोलणं खूप चुकीचं आहे’, असंही मत काहींनी मांडलं आहे.

एका युजरने या व्हिडीओवर लिहिलं, ‘उन्हातान्हातून घरोघरी जाऊन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका गरीब डिलिव्हरी बॉयवर एक लहान मूल रागावतं आणि मोठी माणसं याला शौर्य म्हणतात. दुसरीकडे त्या मुलाची आई कॅमेरासमोर विविध मेकअप प्रॉडक्ट लावलेली दिसते, जे प्लास्टिकच्याच पॅकेजिंगमध्ये विकली जातात.’ या प्रतिक्रियांवर दिया मिर्झाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *