Headlines

Europe heatwave: रस्त्या वितळला, सिग्नल पिघळले; एकीकडे धो धो पाऊस तर दुसरीकडे प्रचंड गरमी, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

Europe heatwave: रस्त्या वितळला, सिग्नल पिघळले; एकीकडे धो धो पाऊस तर दुसरीकडे प्रचंड गरमी, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल
Europe heatwave: रस्त्या वितळला, सिग्नल पिघळले; एकीकडे धो धो पाऊस तर दुसरीकडे प्रचंड गरमी, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल


सध्या भारतात मान्सून येऊन धडकला आहे. त्यामुळे गरमीने त्रस्त झालेले नागरिक हवामानात थंडावा निर्माण झाल्यामुळे सुखावले आहेत. पण भारताबाहेर अतिशय भयानक दृश्य पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये उष्णतेमुळे पिघळणारे रस्ते आणि रस्त्यांवरून जाणाऱ्या कारच्या चाकांवर चिकटणारा डांबर दिसत आहे. हे दृश्य आजकाल युरोपातील देशांमध्ये सामान्य झाले आहे.

काय आहेत व्हिडीओ?

सध्या सोशल मीडियावर युरोपमधील अनेक शहरांमधील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की गरमीमुळे रस्त्यावरील सिग्नल अक्षरश: वितळले आहेत. तसेच उष्णता इतकी आहे की डांबरी रस्त्ये, गाड्यांची चाकं देखील वितळत आहेत. तसेच मार्टमधील चॉकलेट्स, आयस्क्रीम वितळताना दिसत आहेत. काहींनी पशुंच्या गोठ्यात एसी लावला आहे. तर बाकी मांजर, कुत्रे हे रस्त्यावरुन पळत जाऊन सावलीत बसल्याचे दिसत आहे.

ब्रिटनपासून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, इटली, स्पेन आणि इतर अनेक देशांमध्ये सध्या कमाल तापमान २५ ते ३७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. अशा स्थितीत युरोपियन देशांच्या लोकांसोबत तेथील रस्तेही ही प्रचंड उष्णता सहन करू शकत नाहीत. युरोपातील विविध देशांमध्ये यंदा हिटवेव्हमुळे आतापर्यंत १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यात फक्त फ्रान्समध्येच १००० हून जास्त आहेत. सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली आहे की, भारताचे रस्ते जर ४५ डिग्री सेल्सिअस तापमान सहन करतात. तर युरोपातील रस्ते ३०-३५ डिग्री उष्णता का सहन करू शकत नाहीत?

रस्ते हवामानानुसार बनवले जातात

याचा अर्थ असा नाही की युरोपियन देश खराब दर्जाचे रस्ते बांधतात आणि भारतातील रस्त्यांची गुणवत्ता युरोपपेक्षा खूपच चांगली आहे. याचे उत्तर रस्ते बांधण्याच्या प्रक्रिया आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या साहित्यात दडले आहे. प्रत्यक्षात, वेगवेगळ्या देशांमध्ये रस्त्यांचे बांधकाम तेथील हवामान लक्षात घेऊन केले जाते. स्थानिक हवामानानुसारच रस्ते बांधण्यासाठी साहित्य निवडले जाते.
यूकेमधील स्थानिक अधिकारी आणि हायवे इंजिनियर्स यांच्या मते, ब्रिटनचे रस्ते प्रचंड उष्णता सहन करण्यासाठी बांधलेले नसतात. युरोपियन देश असे रस्ते बांधतात जे थंडीमध्ये गोठण्यापासून आणि सामान्य हवामानात गोठलेले वितळण्यापासून (फ्रीज-थॉ सायकल) सुरक्षित राहू शकतात.

युरोपातील रस्ते कोणत्या साहित्यातून बनवले जातात?

-युरोपातील रस्त्यांवर हॉट-रोल्ड डांबर (HRA) आणि घन डांबर काँक्रीट साहित्य वापरले जाते.

-युरोपियन रस्त्यांमध्ये बिटुमेन आणि बारीक एग्रीगेट्स (पाषाणाचे छोटे तुकडे) जास्त प्रमाणात असतात.

-युरोपात रस्ते अधिक लवचिक बनवले जातात, जेणेकरून तेथील थंडीचा सामना करता येईल.

-डांबराचे मिश्रण असे तयार केले जाते की, रस्ता विस्तारल्याने किंवा आकुंचन पावल्याने त्यात तडे पडणार नाहीत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *