Mumbai Local Train Overcrowding | मुंब्रा अपघात, गर्दीवर विधानसभेत चर्चा, उपाययोजनांवर भर.
मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ नुकत्याच झालेल्या दोन लोकल ट्रेनच्या अपघाताचा प्रश्न आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला होता. भातखळकर यांनी उपनगरीय लोकलमध्ये वाढणारी गर्दी, गर्दीवरील उपाययोजना आणि खासगी उद्योग समूहांच्या कार्यालयीन वेळा बदलण्याबाबतच्या निर्णयावर प्रश्न विचारले. केंद्रीय रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवासी संघटनांची बैठक लावण्यात येणार…