मी बायकोला मारून आलोय!; नवऱ्याच्या कबुलीजबाबाने मोठी खळबळ, कल्याण हादरलं
कल्याणमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा खून करून थेट नाशिकच्या पोलीस ठाण्यात जाऊन “मी बायकोला मारून आलोय” अशी कबुली देणाऱ्या पतीमुळे पोलिसही काही काळ चक्रावून गेले. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार अल्पवयीन मुलासमोरच घडल्याचेही उघड झाले आहे. खडकपाडा पोलिसांनी अवघ्या चार तासांत…