Pune | पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून घेतला टोकाचा निर्णय!
पुण्यातील लोणीकंद परिसरात एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी जामकर असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवीचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी करत तिचा छळ केला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या त्रासाला कंटाळून वैष्णवीने घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या…