गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार, जाणून घ्या डिटेल्स
मुंबई : जगविख्यात उद्योजक इलॉन मस्क (Elon musk) यांची कंपनी असलेल्या स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (स्टारलिंक) सोबत महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. स्टारलिंक आणि महाराष्ट्र शासनाचे माहिती तंत्रज्ञान विभागसमवेत सामंजस्य करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, राज्यातील दुर्गम आणि अल्पसेवित भागांपर्यंत उपग्रहाधारित इंटरनेट (internet_ सेवा पोहोचविण्याची दिशा वाटचाल होत असल्याचा असा विश्वास मुख्यमंत्री…