Headlines

GK quiz: बांगलादेशचं खरं नाव काय? ‘बंगाल राष्ट्रा’शी संबंध काय? 99 टक्के लोकांना नाही माहीत

GK quiz: बांगलादेशचं खरं नाव काय? ‘बंगाल राष्ट्रा’शी संबंध काय? 99 टक्के लोकांना नाही माहीत
GK quiz: बांगलादेशचं खरं नाव काय? ‘बंगाल राष्ट्रा’शी संबंध काय? 99 टक्के लोकांना नाही माहीत


बांगलादेशचं खरं नाव काय? Image Credit source: एजन्सी

Bangladesh General Knowledge Questions and Answers: गेल्या काही दिवसांपासून भारताचा शेजारील देश बांगलादेशाची चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या चळवळी आड येथे सत्ता पालट करण्यात आली. त्यानंतर या सर्व घाडमोडींवर जागतिकस्तरावर उलटसुलट चर्चा होत आहे. आता इथं निवडणुकीनंतर नवीन सरकार आले आहे. बांगलादेशाशी भारताचे संबंध मध्यंतरी कमालीचे ताणल्या गेले. त्यामागे पाकिस्तान असल्याचे उघड झाले. भारतामुळे बांग्लादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला. या बांगलादेशाचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे का?

अगोदर भारताचा मग पाकिस्तानचा भाग

तर बांग्लादेश हा भारताचा मूळ भाग आहे. 1947 साली भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली. बांग्लादेश हा पूर्व पाकिस्तानचा भाग होता. पण भाषिक वाद सुरू झाले. बंगाली भाषिक मुस्लिमांवर उर्दू भाषिक मुस्लिमांनी अनन्वित अत्याचार केले. महिला आणि मुलांच्या हत्या झाल्या. पश्चिम पाकिस्तानने पूर्व पाकिस्तानवर अत्याचार सुरू केले. तेव्हा भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशाच्या मुक्तीवाहिनीला मदत केली आणि बांग्लादेश स्वतंत्र झाला. 1971 मध्ये या देशाचे नाव बांग्लादेश पडले.

ण खरे नाव काय?

भारतातून बाहेर पडल्यानंतर हा भाग पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखल्या जाऊ लागला. त्यापूर्वी तो बांगला प्रदेश म्हणून ओळखल्या जायचा. कारण इथली जनता बंगाली भाषा बोलत होती. पण बांगलादेशाचं अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ बांग्लादेश असं आहे. म्हणजे बंगालचे लोक ज्या प्रदेशाला मातृभूमी मानतात त्याला रिपब्लिक ऑफ बांग्लादेश असे म्हणतात.

बांग्लादेश स्वतंत्र झाल्याची घोषणा 26 मार्च 1971 रोजी झाली होती. पण 16 डिसेंबर 1971 रोजी हा देश संपूर्णपणे स्वतंत्र झाला आहे. तर स्वातंत्र्यानंतर या देशाची घटना 4 नोव्हेंबर 1972 रोजी लागू करण्यात आली. ‘अमर सोनार बांग्ला’ हे या देशाचे राष्ट्रगीत आहे. गुरदेव रवीद्रनाथ टॅगोर यांनी ते लिहिले आहे. बांगलादेशाची राजधानी ढाका ही आहे. शेख हसीना यांच्या काळात हा बांगलादेशाची अर्थव्यवस्था वेगाने झेपावत होती. पण स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना  शासकीय नोकरीत आरक्षणाचा मुद्दा पेटवून त्यांचे सरकार उलथवण्यात आले. गेल्या एका वर्षात बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग लागला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *